सीमेजवळ लष्करातील जवानांबरोबर दिवाळी साजरी करण्याचा पायंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीही कायम ठेवणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी हे नियंत्रण रेषेजवळ असलेल्या राजौरी भागातील नौशरामध्ये जवानांबरोबर ४ नोव्हेंरबरला दिवाळी साजरी करणार आहेत. यानिमित्ताने कोणते कार्यक्रम होणार आहे हे स्पष्ट झालं नसलं तरी अर्धा दिवस मोदी जवानांबरोबर व्यतित करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेले महिनाभर राजौरी आणि जवळच असलेला पुंछ परिसर हा चर्चेत आहे. कारण दोन वेगवेगळ्या दहशतवाद विरोधातील कारवायांमध्ये या भागात सहा पेक्षा जास्त दहशतवादी हे ठार करण्यात आले आहेत. असं असलं तरी या कारवाईंमध्ये ९ जवान हे शहीद झाले आहेत. या परिसरात दहशतवाद्यांविरोधात ऑक्टोबरपासून सुरु असलेली शोध मोहिम संपली नसल्याचं अजुनही लष्कराने जाहीर केलेलं नाही हे विशेष.

या भागात अतिशय तणावाचे वातावरण असतांना पंतप्रधान मोदी यांचा राजौरी भागातील दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. वर्षातील एक महत्त्वाचा सण साजरा करत देशाचे नेतृत्व हे सोबत असल्याचं सांगत जवानांचे मनौधर्य वाढवण्याचा प्रयत्न मोदी करणार आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prime minister narendra modi will celebrate diwali with the army soldiers in rajouri
First published on: 03-11-2021 at 17:38 IST