पंजाब सरकारने राज्यातील ४२४ व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली आहे. यामध्ये माजी आमदार आणि माजी पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पंजाब सरकारने राज्यातील व्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्याची ही तिसरी वेळ आहे.

आमदरांसह मंत्र्याचीही सुरक्षा काढली

पंजाबमधील बियास येथील डेरा राधा सोमीच्या सुरक्षेतील दहा जवानांनाही हटवण्यात आले आहे. मजिठाच्या आमदार गणिव कौर मजिठिया यांच्या सुरक्षेतील दोन कर्मचारी काढून घेण्यात आले आहेत. पंजाबचे माजी डीजीपी पीसी डोगरा यांच्या सुरक्षेतील एका व्यक्तीला हटवण्यात आले आहे. सध्या सीएमओमध्ये तैनात असलेले एडीजीपी गौरव यादव यांचे ते सासरे आहेत. माघार घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना शनिवारी जालंधर कॅंट येथील विशेष डीजीपीकडे अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांचीही सुरक्षा काढली

या अगोदर पंजाब सरकारने १८४ लोकांची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये काही माजी मंत्री, माजी आमदारांसह काही अन्य नेत्यांचा सामावेश होता, गेल्या महिन्यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, काँग्रेस आमदार प्रताप सिंह बजवारे, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा मुलगा रणिंदर सिंग यांच्या सुरक्षेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हटवण्यात आले होते.

आठ जणांची काढली होती सुरक्षा

तसेच मे महिन्याच्या सुरुवातीला आणखी ८ जणांची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. यामध्ये अकाली दलचे आमदार हरसिमरत कौर बादल आणि पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांचा सामावेश आहे. या आठ जणांपैकी ५ जणांना Z सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. तर इतर तीन जणांना Y+ श्रेणीची सुरक्षा देण्यात आली होती. या व्यतरिक्त अनेक मंत्री आणि नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. राजिंदर कौर भट्टल, नवतेज सिंग चीमा, परमिंदर सिंग पिंकी, केवल सिंग ढिल्लन, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी, लोकसभा खासदार हरसिमरत कौर बादल, माजी कॅबिनेट मंत्री विजय इंदर सिंगला माजी काँग्रेस खासदार आणि भाजप नेते सुनील जाखर यांची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे.