पंजाबमधील फजिल्का शहरात दोन पाकिस्तानी तस्करांना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी कंठस्नान घातले आहे. यात एक तस्कर जखमी झाल्याचेही वृत्त आहे.
बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तस्करांकडून हेरॉईनची १५ पाकिटे आणि दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. मध्यरात्री २.३० च्या सुमारास बीएसएफच्या जवानांना भारतीय हद्दीत संशयास्पद हलचाली दिसून आल्या. जवानांनी हटकल्यानंतर या तस्करांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी प्रत्युत्तर म्हणून केलेल्या गोळीबारात दोघे ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. पंजाबमध्ये अमली पदार्थांची तस्करी मोठ्या प्रमाणात चालते. त्यामुळे याठिकाणी सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ भारतात आणले जातात.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jun 2016 रोजी प्रकाशित
पंजाबमध्ये २ पाकिस्तानी तस्कर ठार; हेरॉईनची पाकिटे जप्त
तस्करांकडून हेरॉईनची १५ पाकिटे आणि दोन पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 12-06-2016 at 16:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Punjab two pakistani intruders killed by bsf arms drugs recovered