रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे जगभरामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा पुतिन यांनी २४ फेब्रुवारी रोजी केली. तेव्हापासून पुतिन हे जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत असं चित्र दिसत आहे. अमेरिकेसहीत पाश्चिमात्य देशांकडून लादण्यात आलेले निर्बंध, युक्रेनसोबतच्या वाटाघाटींबरोबरच मागील आठवड्यामध्ये पुतिन हे त्यांच्या एका कार्यक्रमामुळे चर्चेत आले. या कार्यक्रमामध्ये त्यांनी स्वत: चं एक महागडं जॅकेट घातलं होतं. या जॅकेटची किंमत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: “तिला हाकलून द्या”; पुतिन यांच्या Girlfriend विरोधात ५९ हजार अर्ज; हिटलरच्या पत्नीशी झाली तुलना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्या जॅकेटची किंमत थक्क करणारी…
युक्रेनमधून क्रिमिया खालसा केल्याच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी देशातील नागरिकांना संबोधित केलं. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी परिधान केलेली कपडे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पुतिन यांनी या कार्यक्रमादरम्यान घातलेल्या जॅकेटची किंमत १० हजार पौंड म्हणजेच जवळजवळ १० लाख ६ हजारांहून अधिक रुपये इतकी आहे. लोरो पियाना या ब्रॅण्डचं जॅकेट पुतिन यांनी घातलं होतं. या जॅकेटची किंमत रशियामध्ये मिळणाऱ्या सर्वसाधारण मासिक पगाराच्या ३० टक्के असल्याचं द सनने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

महागडे कपडे आणि बूट…
पुतिन यांची कपडे ही महागड्या ब्रॅण्डची असतात. त्यांनी याच कार्यक्रमात १० लाखांच्या जॅकेटच्या आत घातलेल्या क्रीम कलरच्या जम्प नेक शर्टची किंमतही चर्चेत आहे. इटालीयन डिझायनर किटोनने डिझान केलेल्या या जम्प नेक शर्टची किंमत जवळजवळ अडीच लाख इतकी आहे.

नक्की वाचा >> पुतिन यांच्या जीवाला निकटवर्तीयांपासूनच धोका?; एक हजार शेफ, लॉण्ड्री बॉय आणि बॉडीगार्ड…

एका कोटची किंमत चार लाख
पुतिन यांचे कोट शिवण्यासाठी एका टेलरची नेमणूक करण्यात आल्याचं द मिररने दिलेल्या वृत्तात म्हटलंय. पुतिन यांच्या एका ब्लेझर कोटची किंमत ही सारसरी चार लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातं. बॉण्ड चित्रपटासाठी ड्रेस डिझाइन करणाऱ्या इटालियन डिझायनर बिरओनिचे कपडे पुतिन वापरतात. त्यांचे बूटही सेवाल्टोर फेरागामो किंवा जॉन लोब या महागड्या ब्रॅण्डचेच असता. या महागड्या ब्रॅण्डवरुन चर्चा होऊन नये म्हणून पुतिन यांचे खासगी स्टायलिस्ट या कपड्यांवरील आणि वस्तूंवरील लेबल काढून टाकतात असं सांगितलं जातं.

नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

मेळाव्यात काय घडलं?
रशियाने २०१४ साली युक्रेनमधून क्रिमिया खालसा केल्याच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात पुतिन यांनी त्यांच्या देशाच्या लष्करी दलांची प्रशंसा केली. ‘मेड इन द यूएसएसआर’ यासारखी देशभक्तीपर गाणी या वेळी गायली गेली. ‘युक्रेन आणि क्रिमिया, बेलारूस आणि मोल्दोवा, हे सर्व आमचा देशच आहेत,’ अशी या गाण्याची सुरुवात आहे. ‘बऱ्याच काळापासून आम्ही अशा प्रकारचे ऐक्य पाहिले नव्हते,’ असे पुतिन यांनी आनंदाने घोषणा देणाऱ्या लोकांना उद्देशून सांगितले.

मोदींनी घातलेला खास कोट
पुतिन यांच्या या जॅकेटमुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीप्रसंगी परिधान केलेला वादग्रस्त बंदगळा सूटची आठवण झालीय. या सूटवर मोदी मोदी अशी अक्षरे होती. पुतिन यांच्या या जॅकेटची आणि मोदींच्या या कोटची किंमत जवळजवळ सारखीच आहे.

नक्की पाहा >> Photos: सव्वा लाखांचं पेन, Apple गॅजेट्सबद्दलचं प्रेम अन् गॉगलची किंमत…; जाणून घ्या मोदींकडील महागड्या वस्तूंबद्दल

मोदींचाही टेलर ठरलेला…
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा ठराविक टेलरकडूनच आपले कपडे शिवून घेतात. मोदी हे त्यांच्या कपड्यांसाठीही ओळखले जातात. मोदी आजही त्यांची कपडे अहमदाबादमधील जेड-ब्लू यांच्याकडूनच शिवून घेतात. बिपिन आणि जीतेंद्र चौहान यांची ही कंपनी आहे. १९८९ पासून मोदी या दोघांकडूनच कपडे शिवून घेतात. आधी बिपिन आणि जीतेंद्र यांचे एक छोटे दुकान होते आज त्यांनी कंपनीपर्यंत मजल मारली आहे.

मोदींचा तो सूट गेला ४ कोटी ३१ लाखांना
ओबामा भेटीदरम्यान मोदींनी घातलेल्या बंदगळा सूटची पक्की किंमत कुणालाही माहीत नाही, तरी तो १० लाखांचा असल्याचे मानले जाते. या सूटवर ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ असे नाव सोनेरी विणकाम करून कोरलेले होते. २०१६ साली झालेल्या लिलावामध्ये हा सूट ४.३१ कोटी रूपयांना विकला गेला आहे. हा टू पीस सूट असून तो विकत घेण्यासाठी चढाओढ लागली होती. नेव्ही ब्लू रंगाचा हा सूट असून तो सुरतचे हिरे व्यापारी लालजी पटेल व त्यांचा पुत्र हितेश पटेल याने सर्वोच्च बोली लावून घेतला. पैसा गंगा स्वच्छतेसाठी जाणार असल्याने आम्ही एवढे पैसे खर्च केल्याचं हितेश यांनी स्पष्ट केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Putin lavish fashion choices wear 2 and half lakh roll neck donate 10 lakh coat scsg
First published on: 24-03-2022 at 13:52 IST