scorecardresearch

“राहुल गांधी हे काँग्रेस पक्षासाठी ‘राहु’सारखे” शिवराज सिंह चौहान यांचा टोला

आपला देश अमृतकाळातून जातो आहे आणि काँग्रेस पक्ष राहुकाळातून असंही चौहान यांनी म्हटलं आहे

MP CM Shivraj Singh Chouhan Said Rahul gandhi is Rahu
जाणून घ्या शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधींबाबत काय वक्तव्य केलं आहे?

राहुल गांधी हे त्यांच्या पक्षासाठी राहुसारखे आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी हा टोला लगावला आहे.राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस पक्ष हा चांगलाच आक्रमक झाला आहे. मात्र भाजपाकडून राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येते आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राहुल गांधींवर टीका केली होती. त्या पाठोपाठ आता मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही राहुल गांधी हे त्यांच्या पक्षासाठी राहु आहेत असं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले आहेत शिवराज सिंह चौहान?

राहुल गांधी हे असे नेते आहेत ज्यांना भारताबाबत काही ठाऊक नाही तसंच त्यांना देशाच्या विविध धोरणांचंही ज्ञान त्यांना नाही. राहुल गांधींना मी हे सांगू इच्छितो की आपला देश हा घटनेप्रमाणे चालतो, कुणाच्या शब्दांवर चालत नाही. भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला आता हे कळलं आहे की देशाची सर्वात मोठी समस्या म्हणजे काँग्रेस पक्ष आहे. तर काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी समस्या म्हणजे राहुल गांधी आहे. एखाद्याला जशी राहुदशा सहन करावी लागते तसंच आहे आहे. राहुल गांधी हे त्यांच्या पक्षासाठी राहुच आहेत. असंही शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

आपला देश अमृतकाळातून चालला आहे आणि काँग्रेस पक्ष राहुकाळातून

आपला देश अमृतकाळातून चालला आहे आणि काँग्रेस पक्ष राहुकाळातून असं म्हणत शिवराज सिंह चौहान यांनी राहुल गांधी यांना आणखी एक टोलाही लगावला आहे. गांधी-नेहरू घराण्याचे गुलाम झालेले नेते हे राहुल गांधी यांना जबरदस्तीने नेता बनवण्याचं ठरवलं आहे. वास्तवात राहुल गांधी हे सर्वात अपयशी, दुर्बल, बेजबाबदार, बेफिकीर आणि अहंकारी नेते आहेत असंही शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 19:32 IST

संबंधित बातम्या