“माझ्याकडे स्वतःचं घर नाही”, हे वाक्य काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याकडून अनेकदा ऐकायला मिळालं आहे. अनेक सभांमध्ये ते या गोष्टीचा उल्लेख करतात. अलिकडेच छत्तीसगडमधल्या रायपूर येथील काँग्रेसच्या ८५ व्या महाअधिवेशनात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते की, माझं वय ५२ वर्ष आहे. परंतु माझ्याकडे अद्याप स्वतःचं घर नाही. यानंतर छत्तीसगडच्या बेमेतरा येथील भाजप नेते देवदास चतुर्वेदी यांनी प्रशासनाला एक पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी राहुल यांना पीएम आवास योजनेअंतर्गत घर देण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवदास चतुर्वेदी यांनी पत्रात राहुल गांधी यांना सरकारी जमीन देण्याची मागणी केली आहे. देवदास यांनी पत्रात लिहिलं आहे की, “असं केल्याने राहुल गांधी यांच्यासारख्या गरिबाला पक्कं घर मिळेल आणि राहुल गांधी यांचं स्वप्नदेखील पूर्ण होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वकांक्षी योजना पंतप्रधान आवासअंतर्गत त्यांना घर मिळेल.” प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनाची क़ॉपी भाजपाने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

देवदास चतुर्वेदी हे भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आणि नवागड जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष आहेत. देवदास यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात लिहिलं आहे की, “काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी नुकतेच छत्तीसगला आले होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की, त्यांचं वय ५२ वर्षे इतकं आहे. अद्याप त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं घर नाही.”

हे ही वाचा >> एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाचा राडा! सिगारेट प्यायला, सहप्रवाशांना लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि…

“पीएम आवास योजनेअंतर्गत पक्कं घर बांधून द्यावं”

देवदास चतुर्वेदी यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, “नवागड नगर पंचायत क्षेत्राअंतर्गत संबळपूर रोडलगत खसरा नंबर ६५९ येथील २५० डीसमील जमीन राहुल गांधी यांना देण्यात यावी. जिथे केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत खासदार राहुल गांधी यांच्यासारख्या गरिबाला पक्कं घर बांधून देता येईल.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi house under pradhan mantri awas yojana bjp leader writes letter to govt chhattisgarh asc
First published on: 12-03-2023 at 14:54 IST