Rahul Gandhi on Savarkar: संविधानाच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सलग दोन दिवस संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संविधानावर चर्चा सुरू आहे. आज शनिवारी लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांनी संविधानावर बोलत असताना भाजपा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. आपल्या भाषणाची सुरुवात करत असताना राहुल गांधी यांनी एका हातात संविधान आणि दुसऱ्या हातात मनुस्मृतीची प्रत घेऊन स्वा. सावरकर यांनी दोन्ही ग्रंथाबद्दल काय म्हटले होते? याचे उदाहरण देऊन भाजपाचे नेते सावरकरांचा अपमान करत आहेत, असे सांगितले.

राहुल गांधी काय म्हणाले?

राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले, “संविधानावर बोलत असताना मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याने संविधानाबाबत केलेले विधान उद्धृत करत आहे. संविधानाबाबत बोलताना सावरकर म्हणाले होते, भारतीय संविधानाबाबत सर्वात वाईट गोष्ट म्हणजे यात काहीही भारतीय नाही. हिंदू राष्ट्रात वेदानंतर मनुस्मृती हा सर्वात पूजनीय असा धर्मग्रंथ आहे. या ग्रंथाने अनेक शतकांपासून देशाच्या आध्यात्मिक आणि दैवी मार्गाचे संहिताकरण केले आहे. आजही मनुस्मृती हा कायदा आहे.”

सावरकर यांनी संविधानाबाबत काय म्हटले आहे, याचे उदाहरण देताना राहुल गांधी म्हणाले की, सावरकर यांनी आपल्या लिहिले की, संविधानात भारतीय असे काहीही नाही. आपल्या संविधानाची जागा मनुस्मृतीने घ्यावी.

तुम्ही सावरकारांचा अपमान करत आहात – राहुल गांधी

“आज भाजपाचे नेते संविधानाचे कौतुक करत आहेत. याचा अर्थ ते सावरकर यांनी जे विचार प्रसूत केले होते, त्याविरोधात जाऊन भूमिका घेत आहेत. जर तुम्ही संविधानाची आज बाजू घेत असाल तर तुम्ही सावरकरांचा अवमान करत आहात”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल गांधी पुढे म्हणाले, “माजी पंतप्रधान इंदिरा गांधी एकदा म्हणाल्या होत्या की, सावरकरांनी ब्रिटिशांशी तडजोड केली होती. महात्मा गांधीजी तुरुंगात गेले, नेहरूजी तुरुंगात गेले आणि सावरकरांनी मात्र ब्रिटिशांना माफीनामा पाठवला.” तसेच भाजपा रात्रंदिवस संविधानावर हल्ला करण्याचे काम करत आहे, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. आम्ही संविधानाचे आचरण करतो तर भाजपाचे लोक मनुस्मृतीला मानतात. यानिमित्ताने भारतातील प्रत्येक गरीब व्यक्तीला सांगायचे आहे की, तुम्हाला प्रत्येकाला संविधानाने संरक्षण दिले आहे.