“डेल्टा व्हेरिएंट कंट्रोल करण्यासाठी काय योजना आहेत?” राहुल गांधींचे मोदी सरकारला ३ प्रश्न!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या घटनांवर ३ प्रश्न विचारले आहेत

Rahul Gandhi targets Modi!
आज पंतप्रधान मोदी मन की बात कार्यक्रमाद्वारे नेमकं काय सांगणार? याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.(संग्रहीत छायाचित्र)

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण भारतात वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील याबाबत चिंता व्यक्त केली असून राज्यांना खबरदारीचा इशारा दिला होता. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला डेल्टा व्हेरिएंटच्या वाढत्या घटनांवर ३ प्रश्न विचारले आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटची तपासणी आणि हे थांबवण्यासाठी सरकार मोठ्या स्तरावर टेस्टींग का करत नाही?, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला.

राहुल गांधी सतत मोदी सरकारवर टीका करत असतात. दरम्यान त्यांनी ट्वीटरवर मोदी सराकरला काही प्रश्न विचारले आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटची तपासणी आणि हे थांबवण्यासाठी सरकार मोठ्या स्तरावर टेस्टींग का करत नाही? तसेच यावर लसी किती प्रभावी आहेत आणि याची संपूर्ण माहिती कधी उपलब्ध होईल?, तिसऱ्या लाटेत यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय योजना आहेत?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी मोदी सरकारला विचारले आहेत.

कोरोना लसीकरणासंदर्भात राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. २३ जून रोजी ते म्हणाले होते की, जोपर्यंत कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात होत नाही तोपर्यंत आपला देश सुरक्षित नाही. दुर्दैवाने, केंद्र सरकार पीआर कार्यक्रमाच्या पुढे जाऊ शकले नाही.

उत्परिवर्तीत डेल्टा उपप्रकार प्रबळ ठरण्याची शक्यता

करोना संक्रमणाचा सध्याचा कल कायम राहिला, तर करोनाचा अधिक संक्रमित होऊ शकणारा डेल्टा हा उपप्रकार हा ‘प्रबळ कुळ’ (डॉमिनंट लायनेज) ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. आतापर्यंत ८५ देशांमध्ये डेल्टा आढळल्याची नोंद झाली असून तो जगातील अनेक ठिकाणी सापडतच आहे.

जगभरात, अल्फा उपप्रकाराची १७० देशांमध्ये किंवा क्षेत्रांमध्ये, बीटा ११९ देशांमध्ये, गॅमा ७१ देशांमध्ये, तर डेल्टा उपप्रकाराची ८५ देशांमध्ये नोंद झाली असल्याचे डब्ल्यूएचओने २२ जूनला जारी केलेल्या ‘कोविड-१९ वीकली एपिडेमिऑलॉजिक अपडेट’ मध्ये म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rahul gandhi questions to the modi government about new delta variant srk

ताज्या बातम्या