लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले असून अजून तीन टप्पे बाकी आहेत. या तीन टप्प्यांच्या प्रचारात आता विरोधी आणि सत्ताधारी एकमेकांवर आगपाखड करत आहेत. पाचव्या टप्प्यातील मतदानाला वेग आला असून आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यातच, भाजपाने राहुल गांधींचा एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. ४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीच भारताचे पंतप्रधान राहतील, असं राहुल गांधी म्हणत असल्याच दावा भाजपाने केलाय. परंतु, हा व्हिडिओ खोटा असल्याचं काँग्रेसने म्हटलंय.

२०२४,४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीच भारताचे पंतप्रधान राहतील, असं राहुल गांधी म्हणाले असल्याचा व्हिडिओ भाजपाने प्रसिद्ध केला आहे. परंतु, काँग्रेसने हा दावा फेटाळून लावला. हा व्हिडिओ खोटा असून काँग्रेसने खरा व्हिडिओ शेअर केलाय. त्यात राहुल गांधी २०२४,४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीच भारताचे पंतप्रधान राहणार नाहीत, असं म्हटल्याचं ऐकू येतंय.

Pm Narendra modi Speech in Nashik
“मोदींनी भाषणात अल्पसंख्याकांचा मुद्दा काढताच, शेतकरी ओरडला कांद्यावर बोला..”, पुढे नेमकं काय घडलं?
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Javed Akhtar
“इस्रायलचे हल्ले निर्दयी, त्यांनी किमान…”; कर्नल वैभव काळे यांच्या मृत्यूनंतर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
bjp accept rahul gandhi debate challenge
भाजपाने स्वीकारले राहुल गांधींचे आव्हान; पंतप्रधान मोदी नव्हे तर ‘हा’ युवानेता चर्चेत सहभागी होणार
sharad pawar narendra modi (4)
“जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर ते…”, शरद पवारांचं मोठं विधान; निवडणूक निकालांबाबत केलं भाष्य!

बुडत चाललेल्या भाजपा आणि नरेंद्र मोदींच्या फेक न्यूज फॅक्टरीला आता फेक व्हिडिओचा आधार आहे. सवयीने राहुल गांधींचे भाषण एडीट करून खोटा व्हिडिओ बनवला गेला आहे आणि त्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडले गेले, अशी पोस्ट काँग्रेसने केली.

काँग्रेसची हीच पोस्ट रिशेअर करत राहुल गांधी म्हणाले, “खोट्याची फॅक्टरी अलेल्या भाजपाने स्वतःला कितीही दिलासा देण्याचा प्रयत्न केला तरीही काही फरक पडणार नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ४ जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात इंडिया आघाडीची चर्चा आहे.”

इंडिया आघाडीकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण?

दरम्यान, एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर आहे. परंतु, इंडिया आघाडीने अद्यापही पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे इंडिया आघाडीवर यामुळे टीका केली जातेय. इंडिया आघाडीकडून राहुल गांधींच्या नावाची चर्चा आहे. परंतु, या नावावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेलं नाही. तसंच, मल्लिकार्जुन खरगे यांचंही नाव चर्चेत असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे निकाल लागल्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.