आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या खर्चाची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे. वाढती महागाई लक्षात घेऊन त्यादृष्टीने निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबत निवडणूक आयोग चाचपणी करीत आहे. जानेवारी २०११ मध्ये निवडणूक आयोगाने प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चाची मर्यादा २५ लाखांवरून ४० लाख रुपयांपर्यंत वाढवली होती.
आता खर्चाची मर्यादा ४० लाखावरून ५६ लाख करण्याचा विचार करीत आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मोठय़ा राज्यांमध्ये उमेदवाराला सध्या निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाख रुपये आहे. गोव्यात प्रत्येक लोकसभेसाठी २२ लाख रुपये तर लक्षद्वीपमध्ये खर्चाची मर्यादा १६ लाख रुपयांपर्यंत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jan 2014 रोजी प्रकाशित
निवडणूक खर्चाची मर्यादा वाढण्याची शक्यता
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर उमेदवारांकडून करण्यात येणाऱ्या खर्चाची मर्यादा वाढण्याची शक्यता आहे.
First published on: 29-01-2014 at 01:51 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raise election expenses bar 30 50 ec to tell govt