Raja Raghuvanshi Murder Case : इंदोरमधील नवविवाहित दाम्पत्य सोनम व राजा रघुवंशी सध्या चांगलेच चर्चेत आहे. या पैकी राजा याची मेघालय येथे हत्या झाल्याचे उघड झाली आहे. २ जून रोजी त्याचा मृतदेह सापडल्यानंतर बेपत्ता असलेली सोनम ही आता उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथे सापडली आहे. महत्त्वाचे म्हणजे सोनमनेच तिचा पती राजा याची हत्या केल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

इंदोरमधील रहिवासी असलेला राजा रघुवंशी हा त्याच्या पत्नीबरोबर मेघालय येथे हनिमूनसाठी गेला होता, पण यादरम्यान त्याचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यान मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन केले असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याच्या शरीरावर अनेक धारधार जखमा आढळून आल्या आहेत. यापैकी दोन जखमा या त्याच्या डोक्यावर असून यापैकी एक ही पुढील तर एक मागील बाजूने असल्याचे आढळून आले आहे. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

राजा आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी हरवल्याची तक्रार देण्यात आल्यानंतर त्यांचा शिलाँगच्या डोंगराळ भागात शोध घेतला जात होता. यादरम्यान काही दिवस हा शोध घेतल्यानंतर अखेर राजा याचा मृतदेह जंगलात आढळून आला होता.

यानंतर हे प्रकरण गूढच राहिले, पण राजा आणि सोनम दोघेही बेपत्ता झाले असावेत अशी चर्चा सुरू असतानात शोध पथकाला पतीचा मृतदेह सापडल्यानंतर त्यामुळे यासंबंधीचे गूढ अधिकच वाढल्याचे पाहायला मिळाले.

पण या प्रकरणाचा उलगडा झाला जेव्हा सोमवारी सोनम उत्तर प्रदेश पोलिसांसमोर गाझिपुर येथे हजर झाली. चेरापुंजीच्या जंगलात तिच्या पतीची मृतदेह आढळून आल्यानंतर तब्बल एक आठवडा उलटल्यानंतर सोनम पोलिसांसमोर हजर झाली.

मेघालय पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की सोनमने (२४) सुपारी देऊन तिच्या पतीची हत्या घडवून आणली आणि तिचे एका राज कुषवाह या व्यक्तीबरोबर प्रेमसंबध होते.

हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार जणांमध्ये राजचा देखील समावेश आहे. तर उर्वरित तीन जण आकाश राजपूत, विकास उर्फ विकी आणि आनंद हे आहेत.

सोनम आणि तिचा पती हे दोघे गेल्या महिन्यात मेघालयमध्ये आले होते आणि २३ मे पासून ते बेपत्ता होते. टुरिस्ट गाईडने पोलिसांना सांगितले की त्याने या दोघांना इतर तीन जणांबरोबर पाहिले होते. त्याच्या १० दिवसांनंतर २ जून रोजी राजा रघुवंशी याचा मृतदेह खोल दरीत आढळून आला होता आणि त्यांनी भाड्याने घेतलेली स्कूटर देखील मावलाखीयत पार्किक लॉटपासून कितीतरी किलोमीटर दूर सोहरारिम येथे चावी लावलेल्या अवस्थेत बेवारस पडलेली आढळली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.