Muslim reservation मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत आज दोन दिग्गज नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झालेली पाहण्यास मिळाली. संसदीय कामकाज मंत्री किरण रिजेजू यांनी कर्नाटक सरकारने मुस्लिम आरक्षण देण्याबाबत जो निर्णय घेतला तो मुद्दा केला. त्यावेळी जे. पी. नड्डा यांनी हे आरक्षण म्हणजे घटनेच्या तत्त्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं.

जे. पी. नड्डा यांची काँग्रेसवर जोरदार टीका

सरकारी कंत्राटं देताना अल्पसंख्याकांना चार टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्या तरतुदीबाबत राज्यसभेत जे.पी. नड्डा यांनी कर्नाटक सरकारवर जोरदार टीका केली आणि काँग्रेसवरही टीका केली. याबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आरक्षण कुणीही रद्द करु शकत नाही असं ठणकावून सांगितलं. राज्यसभेत जे. पी. नड्डा, किरण रिजेजू यांनी आरोपांच्या फैरी झाडल्या. ज्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंनी त्यांना उत्तर दिलं. काँग्रेसचा संविधान वगैरे बदलण्याचा काहीही विचार नसल्याचं खरगे म्हणाले.

किरण रिजेजू यांनी मुद्दा उपस्थित केल्यावर काय घडलं?

राज्यसभेचं कामकाज सुरु होताच संसदीय कामकाज रिजेजू यांनी कर्नाटक सरकारच्या मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. डी.के. शिवकुमार यांनी प्रसंगी राज्यघटना बदलण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं तो उल्लेखही करण्यात आला. रिजेजू म्हणाले हे वक्तव्य एखाद्या सामान्य व्यक्तीकडून आलं असतं तर त्याकडे दुर्लक्षही केलं असतं. मात्र डी. के. शिवकुमार हे घटनात्मक पदावर आहेत त्यांनी असं बोलणं अत्यंत चिंताजनक आहे असं रिजेजू म्हणाले.

किरण रिजेजू काय म्हणाले?

“विरोधाक बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो गळ्यात घालून फिरतात पण आता ते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. संविधान बदलून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची काय योजना आहे?” असा सवाल काँग्रेसला त्यांनी केला. तर खरगे यांनी उत्तर देत काँग्रेस संविधानाशी छेडछाड करण्याचा कुठलाही हेतू नाही असं सांगितलं.

जे. पी. नड्डा काय म्हणाले?

भाजपाचे नेते जे. पी. नड्डा म्हणाले की संविधानच्या तत्त्वाचं उल्लंघन करत आहेत. धर्माच्या आधारावर आरक्षण दिलं जाणार नाही, बाबासाहेब आंबेडकर यांनीच हे सांगितलं होतं. संविधान रक्षणाचा ढोल वाजवण्याचं काम काँग्रेसकडून केलं जातं. आता त्यांचाच पक्ष संविधान बदलण्याची भाषा करतो आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी खोडले सगळे आरोप

दरम्यान काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सगळे आरोप खोडून काढले आहेत. भारताची राज्यघटना वाचवण्याचं काम फक्त काँग्रेसनेच केलं आहे. संविधान बदलण्याची कुठलीही शक्यता नाही अफवा पसरवल्या जात आहेत असंही खरगे म्हणाले.