भारतीय उद्योजक आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरलाइन्सला नागरी उड्डाण मंत्रालय आणि DGCA कडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. CNBC-TV18 ने ४ ऑगस्टच्या अहवालात ही माहिती दिली आहे. २०२१ च्या अखेरीस अकासा एअरलाइन्सचे ऑपरेशन सुरू करण्याचे लक्ष्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहवालानुसार, अकासा एअर नॅरो-बॉडी विमानांचा बोईंग फ्लीट घेण्याची शक्यता आहे आणि विमान खरेदी केल्यानंतर त्याला एअर ऑपरेटरची परवानगी मिळण्याची अपेक्षा आहे. याआधी २८ जुलै रोजी असे अहवाल समोर आले होते की झुनझुनवाला नवीन एअरलाईन उपक्रमासाठी चार वर्षात ७० विमानांची योजना आखत होते, जे त्यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. झुंझुनवाला यांची नवीन एअरलाइनमध्ये सुमारे ४० टक्के भागभांडल असेल आणि या उपक्रमात ते ३५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे.

घोष विमान उद्योगात परत येतील

मिळालेल्या माहितीनुसार, देशी विमान कंपनी इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांच्यासह अकासाचे सह-संस्थापक असतील. घोष या नवीन अल्ट्रा-लो-कॉस्ट कॅरियर (ULCC) सह विमान उद्योगात परत येतील. २०१८ मध्ये, त्याने इंडिगोचे अध्यक्ष आणि हॉल टाइम डायरेक्टर हे पद सोडून उद्योगातून बाहेर पडले. सध्या ते फॅबइंडिया आणि ओयो रुम्समध्ये बोर्ड सदस्य आहेत.

हेही वाचा- भारताने बांधलेल्या सलमा धरणावर हल्ला करण्यासाठी आले होते तालिबानी; करुन बसले स्वतःचं नुकसान

अकासाच्या इतर महत्त्वाच्या पदांवर जेट एअरवेजचे माजी व्हीपी प्रवीण अय्यर सीओओची भूमिका घेतील, तर गोएअरचे माजी महसूल व्यवस्थापन व्हीपी आनंद श्रीनिवासन हे सीटीओ असतील आणि जेटचे माजी फ्लाइट ऑपरेटर व्हीपी फ्लोयड ग्रेसियसही अशीच भूमिका घेण्याची शक्यता आहे. उद्योग क्षेत्रातील दिग्गज नीलू खत्री यांना कॉर्पोरेट अफेअर्सचे प्रमुखपद मिळण्याची शक्यता आहे.

झुनझुनवाला प्रमोटेड एअरलाईन कंपनीने ७० विमानांच्या ताफ्याची योजना आखली आहे. करोना साथीच्या आजारामुळे उद्योगावर खोलवर प्रभाव पडत असताना भारताच्या विमान क्षेत्राला नवीन सुरुवात होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh jhunjhunwala akasa airlines gets green light from ministry of civil aviation srk
First published on: 04-08-2021 at 17:32 IST