कोलंबो : श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड होईपर्यंत विद्यमान पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना हंगामी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ शुक्रवारी देण्यात आली.

श्रीलंकेचे सरन्यायाधीश जयंत जयसूर्या यांनी ७३ वर्षीय विक्रमसिंघे यांना ही शपथ दिली. विक्रमसिंघे यांनी कार्यवाहक राष्ट्राध्यक्षांपेक्षा संसदेला जास्त अधिकार बहाल करण्यासाठी राज्यघटनेत १९ वी दुरुस्ती करण्याचे आवाहन केले. देशात कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

Voting today in 88 constituencies across the country
देशभरात ८८ मतदारसंघांत आज मतदान; मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाकडून आवश्यक सुविधा; चोख सुरक्षा व्यवस्था
Riot manipur
अमेरिकेचा भारताबाबतचा अहवाल अत्यंत पक्षपाती; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून खंडन 
Election Commission cautious stance on Narendra Modi Rahul Gandhi statements
भाषणे नेत्यांची; नोटिसा पक्षाध्यक्षांना! मोदी, राहुल यांच्या विधानांबाबत निवडणूक आयोगाची सावध भूमिका
Over 100 whales rescued off Australian coast
ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरून १०० हून अधिक व्हेलची सुटका

दरम्यान, सिंगापूरला गेलेल्या गोताबया राजपक्षेंनी संसदेचे सभापती महिंदूा यापा अभयवर्धने यांना ई-मेलद्वारे पाठवलेला राजीनामा गुरुवारी मिळाला. त्यांनी हा राजीनामा मंजूर केल्याचे जाहीर केले.

नक्की वाचा >> “जर मुलं सात वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश नऊ वाजता कामाला सुरुवात का करु शकत नाहीत?”

शपथविधीनंतर देशात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याची कठोर उपाय अवलंबण्याचा संकल्प जाहीर करून विक्रमसिंघे म्हणाले, की शांततापूर्ण मार्गाने आंदोलनाचे मीही समर्थन करतो. परंतु दंगलखोर आणि निदर्शक-आंदोलकांमध्ये फरक असतो. खरे आंदोलक हे रस्त्यावर उतरतात परंतु िहसाचार-तोडफोड करत नाहीत. कायदा-सुव्यवस्था बिघडल्याने अर्थव्यवस्थेवर आणखी नकारात्मक परिणाम होईल. कोणताही राजकीय हस्तक्षेप नसलेली कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. त्यात संरक्षणदल प्रमुख, पोलीस महानिरीक्षक आणि तिन्ही सुरक्षादलप्रमुखांचा समावेश आहे.   अध्यक्ष या नात्याने श्रीलंकेच्या राज्यघटनेतील १९ वी घटनादुरुस्ती करण्याला मी प्राधान्य देणार आहे.  या घटनादुरुस्तीमुळे अध्यक्षांपेक्षा संसदेला जास्त अधिकार मिळणार आहेत. गोताबया राजपक्षे यांनी २०१९ मध्ये घटनेतील हे १९ अ कलम रद्द केले होते.

संसदेचे सभापती अभयवर्धने यांनी सांगितले, की नवीन अध्यक्षांची निवड करण्यासाठी संसदेचे २० जुलै रोजी अधिवेशन होईल.

१९ जुलै रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. नव्या अध्यक्षांची निवड शनिवारी संसदेत अधिकृतपणे जाहीर केली जाईल. सध्या राज्यघटनेतील तरतुदीनुसार, विक्रमसिंघे हंगामी अध्यक्षपदी काम करतील आणि नवीन अध्यक्ष निवडीची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अधिकारानुसार या पदाची जबाबदारी सांभाळतील.

महामहिमसंबोधनावर बंदी!

कोलंबो : हंगामी अध्यक्ष विक्रमसिंघे यांनी अध्यक्षांना संबोधित करण्यासाठी ‘महामहिम’ (हिज हायनेस) शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्राध्यक्षांचा वेगळा ध्वजही त्यांनी रद्द केला आहे.

श्रीलंकेत लोकशाही आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यास आपण कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करत विक्रमसिंघे म्हणाले, की राष्ट्राध्यक्षपदासाठीचा वेगळा ध्वज रद्द केला जाईल. देशात फक्त एकच ध्वज असेल, तो म्हणजे राष्ट्रध्वज. त्यालाच अवघा देश वंदन करेल.

पोलिसांनी सांगितले की, दुपारी १२. ४० वाजता भिंत कोसळल्याचा दूरध्वनी आला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सुमारे १०० फुट लांब आणि १५ फूट उंच भिंत कोसळल्याचे दिसले.

दुर्घटनेनंनंतर जखमी १३ मजूरांना नरेला येथील सत्यवादी राजा हरिश्चंद्र रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यापैकी पाच जणांना मृत घोषित करण्यात आले. तर अन्य आठ जणांवर उपचार सुरू आहेत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृत्यू झालेल्या मजूरांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून जखमी लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो, असे त्यांनी म्हटले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांनी सांगितले की, प्रशासन दुर्घटनास्थळी मदत करत आहे.