Rape on woman : ३२ वर्षांच्या एका महिलेवर ती अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असताना बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या महिलेला गुंगी येण्याचं औषध इंजेक्शनमधून दिलं गेलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. या प्रकरणी एका रुग्णालय कर्मचाऱ्यावर आरोप आहे.

कुठे घडली ही घटना?

४ जून रोजी ही घटना राजस्थानच्या एका रुग्णालयात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालय कर्मचाऱ्याने महिलेला गुंगी येण्याचं औषध इंजेक्शनमधून दिलं त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी असंही सांगितलं आहे की जेव्हा ही घटना घडली तेव्हा सदर महिलेचं कुटुंब वॉर्डच्या बाहेर होतं. या महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार तिच्या बेडभोवती असलेले पडदे लावण्यात आले होते. तसंच तिला गुंगीचं औषध देण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. जेव्हा गुंगीच्या औषधाचा अंमल उतरला आणि महिला जागी झाली तेव्हा तिने घडलेला प्रसंग तिच्या कुटुंबाला सांगितलं. या महिलेच्या कुटुंबाने तातडीने रुग्णालय प्रशासनाकडे धाव घेतली. ज्यानंतर या प्रकरणात पोलिसांत तक्रार करण्यात आली. रुग्णालय प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असाही आरोप पीडितेच्या कुटुंबाने केला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी नेमकं काय म्हटलं आहे?

अलवर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक महावीर सिंग यांनी सांगितलं की एका माणसाने आमच्याकडे तक्रार नोंदवली. या तक्रारीत त्याने हे म्हटलं आहे की त्याच्या ३२ वर्षीय पत्नीवर ती आयसीयूत असताना बलात्कार करण्यात आला. ४ जूनला रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेच हे कृत्य केलं असाही आरोप त्याने केला आहे. महिला तेव्हा अर्धवट शुद्धीत आणि अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होती. घडलेल्या प्रसंगानंतर काही वेळाने ती नवऱ्याचं नाव घेऊन रडू लागली. जेव्हा तिचं कुटुंब तिच्याजवळ गेलं तेव्हा तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. या प्रकरणात एक प्रत्यक्षदर्शी महिला रुग्णही आहे. तिनेही रुग्णालयातील कर्मचाऱ्यानेच या महिलेशी गैरवर्तन केल्याचं म्हटलं आहे. यानंतर या घटनेतील पीडितेची वैद्यकीय चाचणी करणयात आली. तसंच तिचा जबाबही नोंदवण्यात आला. आधी मला त्याने इंजेक्शन दिलं. त्यानंतर मला झोप लागल्याप्रमाणे वाटू लागलं त्याच अवस्थेत त्याने माझ्यावर बलात्कार केला असं या महिलेने म्हटलं आहे. आता पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येतो आहे.