ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे हिंदू धर्माबद्दल नेहमीच आग्रही असतात. हिंदू मंदिरांना भेट देणं, हिंदू धर्मातील तत्त्वे अंगीकारणे आदी गोष्टींमुळे ऋषी सुनक नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी लंडनमधील एका मंदिराला भेट दिल्यानंतर मला भगवद्गीतेवर संसद सदस्य म्हणून शपथ घेतल्याचा अभिमान आहे, असं सुनक यांनी म्हटलं आहे. तसंच, धर्मामुळे मला प्रेरणा मिळते असंही ते म्हणाले. या भेटीत ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्तीही त्यांच्याबरोबर होत्या.

ब्रिटनमध्ये लवकरच निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर त्यानी लंडनच्या श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. या भेटीत सुनक यांनी उपासकांना संबोधित केलं आणि सार्वजनिक सेवेतील त्यांच्या दृष्टीकोनातील मार्गदर्शक तत्व म्हणून धर्माबद्दल ते बोलले. ते म्हणाले, “आता मी एक हिंदू आहे आणि तुमच्या सर्वांप्रमाणेच मला माझ्या (हिंदू धर्मावरील) विश्वासातून प्रेरणा आणि दिलासा मिळतो. भगवद्गीतेवर संसद सदस्य म्हणून शपथ घेतल्याचा मला अभिमान आहे.”

हेही वाचा >> VIDEO : टीम इंडियाने टी-२० विश्वचषक जिंकल्यावर लोकांचा आनंद गगनात मावेना, भर रस्त्यात केलं सेलिब्रेशन!

सार्वजनिक सेवेसाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी मुलींना शिकवायच्या आहेत

ते पुढे म्हणाले, “आपली श्रद्धा आपल्याला आपले कर्तव्य करण्यास शिकवते आणि जोपर्यंत कोणी ते निष्ठेने करतं तोपर्यंत परिणामाबद्दल घाबरू नये. माझ्या प्रेरणेने मला हेच मानायला शिकवले आहे. मी माझे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि तेच मला माझ्या मुलींना द्यायचे आहे, जे मला सार्वजनिक सेवेसाठी मार्गदर्शन करते”, असंही ते पुढे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी अकाऊंटंट झालो असतो तर…

या मंदिरात ऋषी सुनक यांनी काही वेळ घालवला. त्यांनी पुजाऱ्यांशी संवाद सादला. हिंदू समाजातील मुलांनी आता फक्त डॉक्टर, वकील, अकाऊंटंट होणं पुरेसं नाहीय”, असं पुजाऱ्यांनी म्हणताच ऋषी सुनक म्हणाले, “आता माझे आई-वडील इथे असते आणि तुम्ही त्यांना असे विचारले असते तर कदाचित ते तुम्हाला म्हणाले असते की मी डॉक्टर, वकील किंवा अकाऊंटंट झाले असतो तर त्यांनी ते पसंत केले असते.: