बिहारमध्ये राजकीय उलथा-पालथ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार हे पुन्हा एकदा आरजेडीला सोडून भाजपाशी हातमिळवणी करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर लालू प्रसाद यादव यांच्या पाटणा येथील निवासस्थानी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे प्रमुख जीतन मांझी यांच्या पक्षाचे चार आमदार आहेत. जीतन मांझी यांचा पाठिंबा मिळावा यासाठी त्यांचा मुलगा संतोष मांझी याला उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर लालू प्रसाद यादव यांनी दिली आहे. तसेच महगठबंधनमध्ये आल्यानंतर लोकसभेच्या जागाही देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान संतोष मांझी यांनी आज तकशी बोलताना सांगितले की, मी अशा प्रस्तावाने हुरळून जाणार नाही. आम्ही एनडीएबरोबर आहोत. राजकारणात असे प्रस्ताव येतच असतात.

hatkanangale loksabha marathi news, cm eknath shinde hatkanangale marathi news
हातकणंगलेची जागा कायम राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे भेटीसत्र
Loksatta chavdi happening in maharashtra politic news on maharashtra politics
चावडी: तो मी नव्हेच!
Shrikant Shinde
कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; भाजपा कार्यकर्त्यांवरही टीका, म्हणाले…
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा

नितीश कुमार यांचा यू-टर्न; जदयू-भाजपाच्या सरकारचा ‘या’ दिवशी होणार शपथविधी?

लालू प्रसाद यादव यांच्याकडून बहुमताच्या आकड्याची जुळवाजुळव सुरू आहे. बिहार विधानसभेतील सदस्यसंख्या २४३ एवढी आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १२२ आमदारांची आवश्यकता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर नितीश कुमार यांनी महागठबंधनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रीय जनता दलाला १२२ चा आकडा गाठण्यासाठी आठ आमदारांची आवश्यकता भासणार आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमार हे गेल्या अनेक वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र इंडिया आघाडीत त्यांना साजेशी अशी भूमिका मिळाली नाही. त्यामुळे ते इंडिया आघाडीत गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. तसेच बिहारच्या बाबतीत लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा निवडणुका घेण्याची सूचना नितीश कुमार यांनी केली होती. मात्र राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने या मागणीचा विरोध केला होता.

‘मांझी यांना मुख्यमंत्री करणे माझा मूर्खपणा’, नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर महादलित मतपेटी हिसकावण्याचा मांझींचा प्रयत्न

बिहार विधानसभेतील संख्याबळावर नजर टाकू –

राष्ट्रीय जनता दल – ७९

भाजपा – ७८

जनता दल (यू) – ४५

काँग्रेस – १९

डावे पक्ष – १६

हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) – ४

एमआयएम – १

अपक्ष – १

दरम्यान नितीश कुमार हे पुन्हा एकदा भाजपाबरोबर युती करणार असल्याच्या चर्चा बोत असताना गुरुवारी (दि. २५ जानेवारी) भाजपा नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले. बिहार भाजपाचे अध्यक्ष सम्राट चौधरी, सुशील मोदी आणि विजय कुमार सिन्हा यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे भाजपामधून नितीश कुमार यांचे स्वागत करण्याची अटकळ बांधली गेली. सम्राट चौधरी यांनी मात्र आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी करण्यासाठी आमच्या बैठका सुरू असल्याचे सांगतिले.