राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी कलयुगात भारताला विश्व गुरू करण्यासाठी एकत्र येऊन वाटचाल करण्यासाठी संघटनेचं महत्त्व विशद केलं. तसेच हिंदू धर्माची शिकवण जगाला देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. यासाठी कुणाचाही धर्म बदलवण्याची गरज नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. मात्र, आपल्या लोकांचाही धर्म बदलू देऊ नका, असाही सूचक इशारा दिला. ते छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात मदकू बेटावर आयोजित ३ दिवसीय ‘घोष शिबिरा’च्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. हे बेट रायपूरपासून ९० किलोमीटर अंतरावर आणि शिवनाथ नदीत आहे. हे बेट त्याच्या निसर्ग सौदर्यासाठी आणि पौराणिक मंदिरांसाठी ओळखलं जातं.

मोहन भागवत म्हणाले, “भारतीय समाजात खूप विविधता आहे. येथे अनेक देवी-देवता आहेत. असं असलं तरी प्रत्येकाला सोबत घेऊन वाटचाल केली पाहिजे. हीच प्रक्रिया मागील अनेक शतकांपासून सुरू आहे. हिंदू धर्माची शिकवण कुणाचंही धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न न करता जगाला देण्याची गरज आहे. भारतातील हिंदू धर्म सत्य आहे आणि आपल्या देशाने हा सत्याचा मार्ग जगाला दाखवला पाहिजे.”

Kashmiri voters form m (1)
काश्मिरी पंडितांना आता ‘फॉर्म एम’शिवाय करता येणार मतदान; आजवर का होती याची आवश्यकता?
Gujarat Freedom of Religion Act
हिंदू अन् बौद्ध धर्म वेगळा, आता धर्मांतरासाठी परवानगी घ्यावी लागणार; गुजरात धर्म स्वातंत्र्य कायदा काय सांगतो?
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”

“एकटा व्यक्ती कधीच शक्तीशाली असू शकत नाही”

“कलयुगात जे कमकुवत आहेत केवळ त्यांचंच शोषण होतं. स्वामी विवेकानंद यांनी देखील कमकुवतपणा हा शाप असल्याचं म्हटलंय. शक्ती म्हणजे संघटीतपणे जगणे आहे. एकटा व्यक्ती कधीच शक्तीशाली असू शकत नाही. कलयुगात संघटन हीच शक्ती आहे. आपल्याला प्रत्येकाला एकत्रित आणलं पाहिजे. त्यासाठी त्यांना बदलवण्याची गरज नाही,” असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

हेही वाचा : मुस्लीम नाही भारतीय वर्चस्वाचा विचार करायला हवा – मोहन भागवत

“आपला हिंदू धर्म जगाला देण्याची गरज आहे. कुणाचंही धर्मपरिवर्तन न करता त्यांना हिंदू धर्माची शिकवण दिली पाहिजे. ही शिकवण प्राथर्ना नसून जगण्याची पद्धत आहे,” असंही भागवत यांनी नमूद केलं.