“पश्चिमेला काबूलपासून ते पूर्वेला चीनविंड नदीपर्यंत, उत्तरेला तिबेट म्हणजेच चीनपासून ते दक्षिणेला श्रीलंकेपर्यंत हा संपूर्ण भूभागातील लोकांचा डीएनए ४० हजार वर्षांपूर्वीचा आहे,” असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. संघाच्या अखंड भारत धोरणाचा अप्रत्यक्षपणे संदर्भ देत भागवत यांनी छत्तीसगडमधील सुरगुजा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात हे विधान केलं आहे. आदीवासीबहूल छत्तीसगडमध्ये मोहन भागवत यांनी, “भारतात राहणारे सर्वजण हिंदू आहेत,” असंही म्हटलं आहे. “प्रत्येकाने एकमेकांच्या प्रार्थना करण्याच्या पद्धतीचा आदर केला पाहिजे,” असंही भागवत यांनी म्हटलं आहे.

“आज विज्ञानामध्ये डीएनए आणि मॅपिंगबद्दल बोललं जातं. आज आपल्याला आपण सर्वजण वेगवेगळे असल्याचं वाटू शकतं. मात्र आपण सर्वजण एकच आहोत. विज्ञानानेही असं सांगितलं आहे की मागील ४० हजार वर्षांपासून आपले पूर्वजही समान आहेत. त्या पूर्वजांनीच आपल्याला सध्याच्या सर्व प्रार्थना पद्धती, भाषा, भोजन करण्याच्या पद्धती शिकवल्या आहेत. त्यामुळे आपण आपल्या या जुन्या धाग्याशी जोडून राहिलं पाहिजे,” अशी अपेक्षा भागवत यांनी व्यक्त केली.

JNU Vice Chancellor Santishree Pandit
“नेहरू, इंदिरा गांधी मूर्ख नव्हते, देशाला एका साच्यात बसवणं अशक्य”, जेएनयूच्या कुलगुरूंची स्पष्टोक्ती
BJP Politics in Tamil Nadu blending caste and faith
तमिळनाडूमध्ये जात व धर्माची मोट बांधण्याचा भाजपाचा प्रयत्न! काय आहे परिस्थिती?
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…

“कोणीही दुसऱ्याची प्रार्थना पद्धत बदलण्याचा प्रयत्न करु नये. प्रत्येकाने एकमेकांच्या प्रार्थना पद्धतीचा सन्मान केला पाहिजे,” असं भागवत म्हणाले. “सर्वेच्च न्यायालयानेही बळाचा वापर करुन काहीही करु नये असं म्हटलं आहे. खरं तर त्याची गरजही नाही,” असंही भागवत यांनी आपल्या भाषणात म्हटलं. सुरगुजा येथील स्थानिकांसमोर दिलेल्या भाषणामध्ये भागवत यांनी हे मुद्दे मांडले. “हिंदू हा धर्म नसून भारतीयांच्या जगण्याची एक शैली आहे,” या सर्वोच्च न्यायालयाचा टीप्पणीच्या आधारे भागवत यांनी न्यायालयीन संदर्भ आपल्या भाषणात दिला.

नक्की वाचा >> विश्लेषण: ‘२०४७ पर्यंत अखंड भारत’ हे RSS चं लक्ष्य पण ‘अखंड भारत’ म्हणजे काय? त्यातून कोणते प्रांत देश म्हणून अस्तित्वात आले?

“आम्ही १९२५ पासून सांगतोय की भारतात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. जे भारताला मातृभूमी मानतात आणि येथील संस्कृती, विविधतेचा सन्मान करतात तसेच कोणत्याही धर्माचे, संस्कृती, भाषेचे किंवा भोजन पद्धतीचा आवलंब करणारे, विचारसणी असलेले लोक यासाठी काम करतात ते सर्व हिंदू आहेत,” असं भागवत म्हणाले.

मोहन भागवत यांनी संघाच्या स्वयंसेवकांच्या बोलण्यावर विश्वास न ठेवता प्रत्येकाने प्रत्यक्षात शाखेत येऊन काय काम चालतं ते पहावं, असं म्हटलं आहे. “आम्ही कब्बडी खेळतो मात्र आमची कोणतीही खेळाची संस्था नाही. आम्ही गाणी गातो मात्र आम्ही काही संगीताशी संबंधित संस्था नाही. आम्ही योगअभ्यास आणि व्यायाम करतो पण आमची यासंदर्भातील कोणथीही संस्था नाही. आम्ही काठ्या वापरतो आणि लढायला शिकतो मात्र अनेकजण दावा करतात तशी आमची कोणतीही लष्करी तुकडी नाही. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही शाखेत येऊन संघाबद्दल जाणून घ्या,” असंही भागवत यांनी म्हटलं.