सीआयडीने आंध्र प्रदेशचे खासदार कानुमारी रघुराम कृष्णम राजू यांना अटक केली आहे. त्यांच्यावर राज्याच्या प्रतिष्ठेच्या विरोधात काम केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. राजू हे आंध्र प्रदेशातील नरसपुरम लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसचे ते खासदार आहेत, परंतु ते बर्‍याच काळापासून बंडखोर वृत्तीचे अनुसरण करीत आहेत. दरम्यान, त्यांना आंध्र प्रदेश सीआयडीने हैदराबाद येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.

सीआयडीच्या अतिरिक्त महानिदेशकांच्या आदेशानुसार खासदारांविरोधात कलम -१२४ अ (देशद्रोह), १५३ अ (समाजात दुर्भावना निर्माण करणे) ५०५ (तणाव निर्माण करणे) १२० ब (षड्यंत्र) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी राजू यांनी सीबीआय स्पेशल कोर्टाला अधीक मालमत्ता प्रकरणात मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. दरम्यान, आयपीसी अंतर्गत ज्या कलमांखाली राजूला अटक करण्यात आली आहे, त्यात राज्य सरकारची प्रतिष्ठा डागाळण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. खासदार कानुमारी रघुराम कृष्णम राजू यांनी आपल्या आरोपात जगन सरकारला भ्रष्टाचार प्रकरणावरून लक्ष्य केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधीकाऱ्यांच्या माहितीनुसार, सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक पी.व्ही. सुनील कुमार यांच्या आदेशानुसार प्राथमिक चौकशी करण्यात आली. राजू आपल्या भाषणांद्वारे नियमितपणे समाजात तणाव निर्माण करणे आणि विविध सरकारी व्यक्तिमत्त्वांवर हल्ला करत होते.  जेणेकरुन लोकांचा सरकारवरील विश्वास कमी होईल. ते समुदाय आणि सामाजिक गटांविरूद्ध द्वेषयुक्त भाषण करत असत. तसेच सामाजिक दुर्भावना निर्माण आणि कायदा व सुव्यवस्थेचा भंग करण्यासाठी काही माध्यम वाहिन्यांद्वारे कट रचल्या जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.