रशियन जनरल मिखाइल कुटुझोव याच्या मेंदूवर फ्रेंच शल्यतज्ञाने शस्त्रक्रिया केली नसती, तर फ्रेंच सम्राट नेपोलियन बोनापार्ट याने रशियावर १८१२ मध्ये विजय मिळवला असता, असे जवळपास दोन शतकांच्या संशोधनातून दिसून आले आहे. अविश्वसनीय असे हे संशोधन अमेरिकेतील डिग्निटी हेल्थ सेंट जोसेफ हॉस्पिटल व मेडिकल सेंटरच्या बॅरो न्यूरॉलॉजिकल इन्स्टिटय़ूटचे संशोधन संचालक मार्क सी प्रेल यांनी केले आहे. वैद्यकशास्त्र एखादी संस्कृतीच कशी बदलून टाकू शकते त्याचे हे उदाहरण आहे असे त्यांचे मत आहे. कुटुझोव हा १७७४ व १७८८ असे दोनदा डोक्यात गोळ्या लागूनही वाचला होता, त्याने नेपोलियनच्या आक्रमकांना माघारी धाडण्यात काही प्रमाणात यश मिळवले होते. रशियन व फ्रान्समधील काही प्रमुख स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार फ्रेंच शल्यविशारद जीन मॅसॉट यांनी यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. कुटुझोव यांच्या मेंदूवर त्यांनी शस्त्रक्रिया केली.
मिखाइल कुटुझोव यांच्यावर नेमकी कुणी शस्त्रक्रिया केली होती व त्यानंतर काय घडले याचा शोध आम्ही घेत होतो, असे प्रेल यांनी म्हटले आहे. मॅसॉट यांनी नेमकी काय शस्त्रक्रिया केली याचे पूर्ण तपशील उपलब्ध नाहीत पण त्याने मेंदूशल्यक्रियेतील आधुनिक तंत्र वापरले होते व ते आजही वापरले जाते. १७७४ मध्ये क्रायमिया येथे तुर्काबरोबरच्या युद्धात त्यांना गोळी लागली होती. त्यानंतर कुटुझोव यांचे वागणे विचित्र बनले होते. त्यातून त्यांनी नेपोलियनचा पराभव कसा केला याचे डावपेच लक्षात येतात. डोक्यात गोळी झाडल्याने कुटुझोव यांची निर्णयक्षमता कमी झाली होती. त्यांचे व्यक्तिमत्त्वच बंदुकीच्या गोळीच्या आघाताने बदलले होते. त्यामुळे त्यांनी १८१२ मध्ये नेपोलियनच्या सैन्याला आव्हान देण्याऐवजी संघर्ष थांबवला व मॉस्को शहर जाळून टाकले व लष्करासह पूर्व मॉस्कोकडे पळाले. नेपोलियनच्या लष्कराने त्यांचा पाठलाग करून मॉस्कोवर आक्रमण केले पण त्यांना अन्न व पाणी मिळाले नाही, रशियातील थंडीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही व नेपोलियन लष्कर सोडून पॅरिसला पळून गेला. काहींच्या मते कुटुझोव हे विक्षिप्त बनले होते. त्यांची मेंदूची शस्त्रक्रिया केल्याने त्यांचे जीवन वाचले पण त्यांच्या मेंदू व डोळ्याला जखमा झालेल्याच होत्या. पण त्यावर जो उपाय करण्यात आला त्यामुळे त्यांना योग्य निर्णय घेण्यात मदत झाली. जर ते जखमी
झाले नसते तर त्यांनी नेपोलियनला आव्हान दिले असते व त्यांचा पराभव झाला असता, असे प्रेल यांनी म्हटले आहे.
काहींनी कुटुझोव यांच्या डावपेचांचे श्रेय त्यांच्या नशिबाला दिले असले तरी मेंदूची शस्त्रक्रिया हा त्यातील महत्त्वाचा भाग होता त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे संशोधकांचे म्हणणे आहे. ‘न्यूरोसर्जरी’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onरशियाRussia
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Russia may defeated napoleon
First published on: 01-08-2015 at 01:44 IST