राजस्थान काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पदावरून रणकंदन माजले होते. यावेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आमने-सामने उभे ठाकले होते. त्यानंतर आता अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना ‘गद्दार’ संबोधित करत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच, सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून पैसे घेतल्याचा आरोपही गेहलोत यांनी पायलट यांच्यावर केला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अशोक गेहलोत गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. तेव्हा ‘एनडीटीव्ही’शी बोलताना गेलहोत यांनी सचिन पायलट यांना लक्ष्य केलं. “गद्दार कधीच मुख्यमंत्री नाही बनू शकत. हायकमांड सुद्धा सचिन पायलट यांना मुख्यमंत्री नाही करू शकत. कारण, सचिन पायलट यांच्या पाठीमागे दहा आमदार नसून, त्यांनी बंडखोरी केली, पक्षाला धोका दिला, ते एक गद्दार आहे,” अशा शब्दांत गेहलोत यांनी टीकेचे बाण पायलट यांच्यावर सोडले आहेत.

हेही वाचा : नोटबंदी केल्यावर देशात किती रुपये शिल्लक होते? पी चिदंबरम यांची सर्वोच्च न्यायालयात महत्वाची माहिती; म्हणाले…

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार पाडण्यासाठी २०२० साली झालेल्या बंडखोरीबाबत बोलताना गेहलोत म्हणाले, “देशात पहिल्यांदा असे झाले की, पक्षाच्या अध्यक्षाने आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. यासाठी भाजपाने पैसे पुरवले, ज्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे काही वरिष्ठ नेत्यांचा सहभाग होता,” असा आरोप गेहलोत यांनी लगावला.

हेही वाचा : “तुमचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही,” कर्नाटकमधील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं फडणवीसांना जाहीर आव्हान, म्हणाले “सोलापूर, अक्कलकोटही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. त्यांच्यात दिल्लीत बैठकही झाली. तसेच, सचिन पायलट यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना ५ कोटी तर काहींना १० कोटी रुपये मिळाले. हे पैसे दिल्लीतील भाजपा कार्यालयातून देण्यात आले होते. सचिन पायलट यांच्याबरोबर बंडखोरी केलेल्या आमदारांची धर्मेंद्र यांनी भेट घेतली. पण, काँग्रेसच्या नेत्यांना भेटू दिले नाही,” असेही अशोक गेहलोत यांनी सांगितलं.