जगभरात करोनामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची पगार कपात करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रोने करोना काळात कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा चांगली बातमी दिली आहे. शुक्रवारी कंपनीने पुन्हा एकदा पगारवाढ जाहीर केली. या वेतनवाढीचा फायदा कंपनीतील जवळपास ८० टक्के कर्मचार्‍यांना होईल. ही पगारवाढ १ सप्टेंबर २०२१ पासून लागू होईल. २०२१ मध्ये विप्रोने दुसऱ्यांदा कर्मचाऱ्यांचा पगार वाढविला आहे. कंपनीच्या घोषणेनुसार ही वेतनवाढ बँड ३ पर्यंतच्या कर्मचार्‍यांना लागू असेल. या बँडमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि त्याखालील कर्मचारी समाविष्ट आहेत. यापूर्वी जानेवारी २०२१ मध्येही कंपनीने बँड ३ पर्यंतच्या ८० टक्के कर्मचार्‍यांचे पगार वाढवण्याची घोषणा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सी १ बँड कर्मचार्‍यांच्या पगारात जूनपासून वाढ

सी १ बँडच्या पात्र कर्मचार्‍यांना जूनपासून वाढीव वेतन मिळणे सुरू होईल. या बँडमध्ये व्यवस्थापक आणि त्यावरील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बँडमधील वेगळ्या देशात स्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची सरासरी दरवाढ उच्च एकेरी अंकात करण्यात आली आहे. तर ऑनसाइट कर्मचार्‍यांमध्ये, मिड-सिंगल डिजिटमध्ये वाढ झाली आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचार्‍यांना जास्त पगार देण्यात दिली जाईल असे कंपनीने म्हटले आहे.

हे ही वाचा >> भारतातल्या IT क्षेत्रातल्या ३० लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार? – बँक ऑफ अमेरिका

विप्रोचा अ‍ॅट्रिशन दर १२.१ टक्क्यांवर

आर्थिक वर्ष २०२१ च्या चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना विप्रोने सांगितले की, कंपनी कर्मचारी कायम ठेवण्यासाठी सर्व पावले उचलेल. चौथ्या तिमाहीत विप्रोचे अ‍ॅट्रिशन दर १२.१% होते. म्हणजेच चौथ्या तिमाहीत कर्मचारी कमी करण्याचा दर १२.१% होता. विप्रोचे सीएचआरओ सौरभ गोविल म्हणाले होते की आम्ही कौशल्य आधारित बोनस देणार आहोत आणि त्यासाठी तयार आहे. २०२१ आर्थिक वर्षात कंपनीने कॅम्पसमधून १०,००० नवे कर्मचारी नियुक्त केले आहेत.

एका वर्षात दुसऱ्यांदा पगार वाढवणारी दुसरी कंपनी

वर्षात दोनदा पगार वाढवणारी विप्रो ही देशातील दुसरी कंपनी बनली आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) दोनदा पगार वाढवण्याची घोषणा केली होती. टीसीएसने आर्थिक वर्ष २०२१ आणि एप्रिल २०२१ च्या तिसर्‍या तिमाहीत पगार वाढवण्याची घोषणा केली होती. टीसीएसने ६ महिन्यांच्या अंतराने पगार वाढविला. टीसीएस कर्मचार्‍यांच्या वेतनात ६ महिन्यांच्या कालावधीत १२ ते १४% वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Second pay hike for wipro employees in one year abn
First published on: 19-06-2021 at 14:54 IST