वी दिल्ली : पोर्ट ब्लेअर येथे एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी वरिष्ठ सनदी अधिकारी आणि अंदमान-निकोबारचे माजी मुख्य सचिव जितेंद्र नरेन यांना सोमवारी केंद्र सरकारने निलंबित केले. नरेन यांच्याविरोधात त्वरित कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थमंत्री अमित शहा यांनी दिले होते. नरेन सध्या दिल्ली फायनान्शियल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आहेत. नरेन यांनी २१ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याबाबतचा अहवाल केंद्राला रविवारी  पोलिसांकडून मिळाला.