सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेला ‘तेहलका’चा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याची न्यायालयीन कोठडी १० दिवसांनी वाढविण्यात आली आहे. प्रथमवर्गीय न्यायदंडाधिकारी क्षमा जोशी यांनी यासंबंधी निर्णय दिला.
याप्रकरणी तेजपालचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्याला गेल्या ३० नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तेजपालने आता जामीन अर्ज नव्याने दाखल केला असून त्यावर उभय बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर त्यावर आता ७ जानेवारी रोजी सत्र न्यायालयाकडून निर्णय जाहीर करण्यात येईल.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2014 रोजी प्रकाशित
तेजपालच्या न्यायालयीन कोठडीत वाढ
सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याचारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेला ‘तेहलका’चा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याची न्यायालयीन

First published on: 05-01-2014 at 06:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual assault case court extends tarun tejpals judicial custody by 10 days