समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचं आज ( १० ऑक्टोबर ) ८२ व्या वर्षी निधन झालं. मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांनी अखेरचा श्वास घेतला. मुलायम सिंह यादव यांच्या निधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुलायम सिंह यादव यांच्या जाण्याने समाजवादी चळवळीचं मोठं नुकसान झाल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्या राजकीय विचारांवर मुलायम सिंह यादव चालत होते. उत्तर प्रदेशचे विरोधी पक्षनेते ते मुख्यमंत्री अशी जबाबदारी त्यांनी हाताळली. त्यानंतर त्यांनी देशाच्या राजकारणात पाऊल टाकले. संसदेत झुंजार, प्रभावी अशा प्रतिमेचं दर्शन त्यांनी देशातील नागरिकांना दिलं. देशातील विरोधी पक्षाला एकत्र आणण्याची मुलायमसिंह यादव यांची इच्छा होती. मात्र, त्यापूर्वीच ते आपल्यातून गेले. त्यामुळे समाजवादी चळवळीच मोठं नुकसान झालं.”

पाहा व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – मोदीही हळहळले! मुलायम यांच्यासोबतचे आठ फोटो पोस्ट करत म्हणाले, “मी कायम त्यांची मतं…”

“आम्ही संसदेत एकत्र काम केलं आहे. पण, त्याआधी ते उत्तप्रदेशच्या राजकारणात सक्रिय असताना त्यांच्याशी माझा चंद्रशेखर यांच्यामुळे परिचय झाला. चंद्रशेखर आणि मुलायम सिंह यांचे घनिष्ठ संबंध होते. मुलायम सिंह यांची विचारधारा लोहिया यांच्याशी निगडीत होती,” अशा आठवणींना शरद पवारांनी उजाळा दिला.