काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमधील संभाषणात शशी थरूर म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे खूप हुशार व्यक्ती आहेत. त्यांनी अशी अनेक कामं केली आहेत, ज्यामुळे ते लोकप्रिय झाले. यासोबतच शशी थरूर यांनी भाजपावर निशाणा साधत धर्म आणि जातीच्या आधारावर फूट पाडल्याचा आरोप केला.

पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना शशी थरूर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबरदस्त हुशार व्यक्ती आहेत. त्यांनी काही अशी कामं केली आहेत, जी राजकीयदृष्ट्या खूप प्रभावशाली ठरली आहेत. भाजपा उत्तर प्रदेशमध्ये इतक्या मोठ्या फरकाने जिंकेल, असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण ते जिंकले. या विजयाचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान मोदींना जाते.”

यासोबतच भाजपावर टीका करत शशी थरूर म्हणाले की, “भाजपा जाती आणि पंथाच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करते. त्यांच्या दृष्टीने जय श्री राम म्हणणारा एकमेव व्यक्ती हिंदू आहे. भारतीय मतदारांनी पक्षांना नेहमीच आश्चर्याचा धक्का दिला आहे, एकेदिवशी भाजपालाही याची जाणीव होईल,” असं थरुर यांनी म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेश निवडणुकीबद्दल बोलताना शशी थरूर म्हणाले की, भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले, पण लोकांनी समाजवादी पक्षाला मतदान केले. कारण सपालाही चांगल्या जागा मिळाल्या. त्यामुळे विरोधकांना बळ मिळेल. त्याच वेळी, गोवा आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेस पक्ष अधिक चांगली कामगिरी करू शकला असता आणि काँग्रेस पक्षात सर्वात मोठा पक्ष बनण्याची क्षमता असल्याचे शशी थरूर म्हणाले.