गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. तेव्हा आमदार, खासदारांच्या बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा सांगितला होता. यानंतर निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

ठाकरे गटाच्या याचिकेवर आज ( १८ सप्टेंबर ) सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जे.बी. पारदीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठसमोर सुनावणी पार पडली. यावेळी, “तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ,” असं सरन्यायाधीशांनी सांगितलं आहे.

हेही वाचा :


देश-विदेश

“…म्हणून विधानसभा अध्यक्षांनी १४ सप्टेंबरला सुनावणी घेतली”, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया!

नेमकं काय घडलं?

ठाकरे गटाच्या वतीने युक्तिवाद वकील कपिल सिब्बल म्हणाले, “शिवसेना चिन्हाचे प्रकरण तुम्हाला ऐकावं लागेल. कृपया तारीख निश्चित करावी.”

त्यावर, “तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ,” असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. “११ मे च्या निकालानंतर काहीही झालेलं नाही. ठराविक वेळेत घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात म्हटलं होतं. पण, ११ मेनंतर काहीही झालं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर राखला गेला नाही,” असं सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

हेही वाचा : “११ मे पासून आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांनी काय केलं?” आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“विधानसभा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाला उत्तरदायी आहेत. तुम्हाला हे प्रकरण ताबडतोब हाती घ्यावं लागेल. एक आठवड्यात सुनावणी घ्या. दोन आठवड्यात काय कारवाई केली, ते आम्हाला सांगा. ठराविक वेळेत निर्णय घ्या. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल, अशी अपेक्षा आहे,” असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं.