Video Viral: गुरुवारी ताजमहालाच्या पश्चिम दरवाज्याजवळील पार्किंगमधल्या एका कारमध्ये एक वृद्ध व्यक्ती कापडात बांधलेल्या अवस्थेत सापडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. त्या वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबाने त्यांना तिथे सोडून दिलं असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
या व्यक्तीची ओळख पटली असून त्यांचे नाव हरिओम तांदळे असून, ते मुंबईतील रहिवासी सिद्धेश्वर तांदळे यांचे वडील आहेत. पार्किंग लॉटमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकाला ही व्यक्ती कारमध्ये कापडाने बांधलेल्या अवस्थेत सापडली. त्यांची प्रकृती चिंताजनक होती, असं पोलिसांनी सांगितलं.
https://x.com/BarabankiU66690/status/1945768709810946061?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwtermघटनास्थळी उपस्थित नागरिकांनी कारची काच फोडून या वृद्ध व्यक्तीला बाहेर काढलं.
पोलीस उपायुक्त सोनम कुमार म्हणाले, “सिद्धेश्वर तांदळे हे त्यांच्या कुटुंबाबरोबर ताजमहाल पाहण्यासाठी आले होते. त्यांच्या वडिलांना कारमधून बाहेर काढण्यासाठी काच फोडावी लागली.” कुटुंब ताजमहाल पाहायला गेलं असताना त्यांनी कदाचित हरिओम तांदळे यांना तिथेच सोडून दिलं असावं, असं पोलिसांनी सांगितलं.
रुग्णवाहिका बोलावण्यात आली होती. मात्र कारमधून बाहेर काढल्यानंतर वृद्धाची प्रकृती सुधारल्याने तिथेच उपचार करण्यात आले, असं कुमार यांनी सांगितलं. “सध्या सिद्धेश्वर तांदळे आपल्या वडिलांबरोबर निघून गेले आहेत,” असं डीसीपी कुमार यांनी सांगितलं.
या प्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, असंही पोलिसांनी सांगितलं.%5E1945768709810946061%7Ctwgr%5Ec13d06c3ee4201f398435649983d36cdcc4ee244%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.moneycontrol.com%2Fcity%2Fshock-at-agra-s-taj-mahal-parking-as-senior-citizen-found-tied-up-in-locked-vehicle-rescued-by-public-watch-article-13294376.html