आम आदमी पार्टीचे महरौली येथील आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आहे. यादव जेव्हा मंदिरातून दर्शन घेऊन परतत होते, तेव्हा त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर  हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते अशोक मान यांचा मृत्यू , तर अन्य एकजण जखमी झाला आहे. याप्रकऱणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर आमदार नरेश यादव हे मंदिरात गेले होते. त्यांनतर तेथून ते परतत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार यादव म्हणाले, ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. मला हल्ल्याचे कारण माहिती नाही, परंतु हा अचानक करण्यात आलेला हल्ला आहे. जवळपास चार राउंड फायर करण्यात आले. ज्या वाहनात मी होतो, त्यावर हल्ला करण्यात आला. मला विश्वास आहे की जर पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला तर हल्लेखोरास ओळखता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी देखील एका मृत्यूच्या वृत्ताबाबत दुजोरा दिला आहे. नरेश यादव यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे कुसुम खत्री यांचा १८१६१ मतांनी पराभव केला आहे. नरेस यादव यांना ६२४१७ मतं मिळाली आहेत.