श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाच्या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांना नवीन पुरावा हाती लागला आहे. लिव्ह-इन-पार्टनर आफताब अमीन पूनावालाने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली आणि नंतर घरामध्येच तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रिजमध्ये ठेवले. टप्प्याटप्प्यात तीन आठवड्यांमध्ये आफताबने या तुकड्यांची विल्हेवाट लावली. मात्र हे सर्व करताना त्याने जितकं पाणी वापरलं त्यावरुन तो अडचणीत येणार असल्याचं दिसत आहे. आता पाणी वापरण्यावरुन गुन्हा कसा सिद्ध होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यामागे कारणीभूत आहे दिल्लीमधील आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाखालील केजरीवाल सरकारचा एक निर्णय.

पाहा >> Shraddha Murder Case Photos: प्रेयसीच्या मृतदेहाचे ३५ तुकडे, कबुली जबाब अन् थेट ‘त्या’ जंगलात आफताबबरोबर पोहोचले पोलीस

mumbai, Brother Killed, Jogeshwari East, House Redevelopment Dispute, murder case, murder in jogeshwari, murder in mumbai, crime news, crime in mumbbai, crime in jogeshwari, marathi news,
पुनर्विकासाच्या वादातून जोगेश्वरी येथे भावाची हत्या, आरोपीला मेघवारी पोलिसांकडून अटक
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
delhi high court
नावाने ओळखले जाण्याचा अधिकार ओळखनिश्चितीसाठी महत्त्वाचा!

श्रद्धा आणि आफताब दिल्लीत छत्तरपूर परिसरात भाड्याच्या घरात रहात होते. याच ठिकाणी आफताबने लग्नाच्या वादातून १८ मे रोजी श्रद्धाची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पुढील तीन आठवड्यांमध्ये त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते फ्रिजमध्ये ठेवले. नंतर टप्प्याटप्प्यात  दररोज रात्री मृतदेहाचा एकेक तुकडा घेऊन तो मेहरोलीच्या जंगलात नेऊन फेकत असे. श्रद्धाशी अनेक महिन्यांपासून संपर्क झाला नाही यासंदर्भातील तक्रार तिच्या मूळ गावी म्हणजे वसईमध्ये तिच्या वडीलांनी पोलिसांकडे केली. त्यानंतर सुरु झालेल्या तपासादरम्यान या शनिवारी आफताबला श्रद्धाची हत्या केल्या प्रकरणी अटक करण्यात आली.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: पूनावाला कुटुंबाला होती हत्येची कल्पना? १५ दिवसांपूर्वीच घर सोडताना आफताबचे वडील म्हणाले, “माझ्या मुलाला…”

पोलिसांनी तपास सुरु केला असून हे दोघेच राहत असलेल्या या घरामध्ये पोलिसांना काही कागदपत्रं सापडली आहेत. तसेच शेजाऱ्यांकडे केलेल्या चौकशीदरम्यान पोलिसांना एक विचित्र गोष्ट आढळून आली आणि ती म्हणजे आफताबच्या फ्लॅटमध्ये होणारा पाण्याचा अतिरिक्त वापर. दिल्ली सरकारच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याला प्रत्येक घरी २० हजार लिटर पाणी मोफत दिलं जातं. पाण्याचा अतिरिक्त वापर केला म्हणजेच २० हजार लिटरहून अधिक पाणी वापरलं तरच बिल पाठवलं जातं. या इमारतीमध्ये कोणालाही पाण्याचं बील येत नाही. मात्र दुसरीकडे आफताबच्या फ्लॅटचं बील थकित असल्याचं इमारतीत राहणाऱ्यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: फ्रिजचं बिल, करवत विकणाऱ्याचा जबाब, वडिलांचा DNA अन् बँक…; आफताबविरोधात सापडले १५ पुरावे

सुत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या माहितीनुसार आफताबच्या शेजाऱ्यांनी आफताबचं पाण्याचं ३०० रुपये बील भरलेलं नसल्याची माहिती दिली. हे बील थकीत म्हणून जमा असून यावरुनच आफताबने सर्वसाधारण वापरापेक्षा अधिक पाणी वापरल्याचं स्पष्ट होतं आहे. पाणी वापऱ्याच्या दुष्टीकोनातून पोलीस तपास करणार आहे. आफताबच्याच मजल्यावर राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांनी त्यांना २०० लीटर मोफत पाणी नियमानुसार बीलच येत नाही. मात्र त्याचवेळी आफताबच्या फ्लॅटचं ३०० रुपये बील थकित आहे. त्यामुळेच पोलीस या दिशेनेही तपास करणार आहे.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: “आम्ही कोळी हिंदू आणि तो मुस्लीम…”; श्रद्धाच्या वडिलांनी FIR मध्ये काय म्हटलं? घर सोडताना शेवटचे शब्द…

“खून केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन झाल्यावर आफताबने मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर करुन फरशी पुसून काढली. त्यामुळेच त्याला पाण्याचं बील आहे. आफताब अनेकदा इमारतीच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी आहे की नाही पहायला जायचं असंही शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं,” अशी माहिती सुत्रांनी एएनआयला दिली.

नक्की वाचा >> Shraddha Murder Case: मृतदेहाचे ३५ तुकडे ठेवण्यासाठी आफताबने श्रद्धाच्याच पैशाने विकत घेतलेला फ्रिज?

ज्या घरामध्ये आफताब आणि श्रद्धा भाड्याने राहत होते त्या घराच्या करारपत्रावरही आफताबने श्रद्धाचं नाव मुख्य भाडेकरु म्हणून तर आपल्या नाव साक्षीदार म्हणून टाकलं होतं. “घरमालकाचा हे दोघे विवाहित नाही हे ठाऊक होतं. त्यांनी ब्रोकरच्या माध्यमातून हा फ्लॅट भाड्याने दिला होता. आफताब दर महिन्याच्या ८ ते १० तारखेदरम्यान घराचं भाडं म्हणून नऊ हजार रुपये मालकाच्या खात्यावर पाठावायचा,” असंही सुत्रांनी सांगितलं.

नक्की वाचा >> “मी आजची रात्र याच्याबरोबर राहिले तर…”; प्रियकर आफताबने हत्या करण्यापूर्वी श्रद्धाने मित्राला केला होता Whatsapp मेसेज

दिल्ली पोलिसांनी आज साकेत न्यायालयासमोर आरोपी आफताबला हजर केलं होतं. यावेळेस न्यायालयाने त्याच्या नारको चाचणीला परवानगी दिली असून पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.