बिहार प्रदेश भाजपचे काही हुकूमशाही वृत्तीचे नेते पक्षात गोंधळाची आणि अनिष्ट स्थिती निर्माण करीत असल्याचा आरोप भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी येथे केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील जाहीर सभा रद्द होणे हा नकारात्मक संदेश असल्याचेही सिन्हा म्हणाले. नरेंद्र मोदी हे पक्षाचे प्रभावी प्रचारक असून त्यांना आपल्या जाहीर सभा रद्द कराव्या लागल्याने नकारात्मक संदेश गेला असल्याचे सिन्हा यांनी ट्वीट केले आहे. सिन्हा यांचे नाव प्रचारकांच्या यादीत असूनही त्यांनी बिहारमध्ये अद्याप एकही सभा घेतलेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2015 रोजी प्रकाशित
शत्रुघ्न सिन्हा यांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील जाहीर सभा रद्द होणे हा नकारात्मक संदेश असल्याचेही सिन्हा म्हणाले.
Written by रत्नाकर पवार

First published on: 18-10-2015 at 02:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shtrughna sinha bihar statement