Six professors are suspended for promoting non-vegetarianism and love jihad in indore government law college spb 94 | Loksatta

मांसाहाराला प्रोत्साहन देणाऱ्या सहा प्राध्यापकांना केलं निलंबित, इंदूरमधली घटना

अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदच्या तक्रारीनंतर इंदूरमधील शासकीय विधी महाविद्यालयातील सहा प्राध्यापकांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे.

मांसाहाराला प्रोत्साहन देणाऱ्या सहा प्राध्यापकांना केलं निलंबित, इंदूरमधली घटना
फोटो सौजन्य – नवीन शासकीय विधी महाविद्यालय फेसबुक पेज

अखिल भारतीय विद्यार्थी परिषेदच्या तक्रारीनंतर इंदूरमधील शासकीय विधी महाविद्यालयातील सहा प्राध्यापकांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या प्राध्यापकांकडून कट्टरतावादी विचारधारा, लव्ह जिहाद आणि मांसाहाराला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे. मिर्झा मोजीज बेग, फिरोज अहमद मीर, सुहेल अहमद वाणी आणि पूर्णिमा बेसे, मिलिंद कुमार गौतम, अमेक खोखर अशी निलंबित करण्यात आलेल्या प्राध्यापकांची नावे आहेत.

हेही वाचा – “दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट

अभाविपच्या तक्रारीनुसार, इंदुरच्या शासकीय विधी महाविद्यालयातील काही मुस्लीम प्राध्यपकांकडून लव्ह जिहाद आणि कट्टरतावादी विचारधारेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच या महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राचार्य शुक्रवारी नमाज अदा करण्यासाठी जातात, त्यामुळे शुक्रवारी महाविद्यालयात शिकवले जात नाही, असा आरोपही अभाविपकडून करण्यात आला आहे.

हेही वाचा – “जाहिरातीत सांगितल्यापेक्षा गाडी कमी मायलेज देते”, ग्राहकाची कोर्टात याचिका, निकाल देताना कोर्टानं संगितलं…!

दरम्यान, महाविद्यालयाचे प्राचार्य रहमान यांनी अभाविपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ”अभाविपने ज्याप्रकारे आरोप केले आहेत, ते अत्यंत चुकीचे आहेत. महाविद्यालयात अशाप्रकारे कोणतेही वातावरण नाही. मात्र, अभाविपकडून करण्यात आलेले आरोप गंभीर असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसेच संबंधित प्राध्यापकांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 22:56 IST
Next Story
इंडोनेशियात विवाहपूर्व शरीरसंबंध बेकायदा ठरणार, येतोय नवीन कायदा