मध्यप्रदेश विधानसभेसाठी १७ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. सध्या भाजपाचे केंद्रीय मंत्री प्रचार करताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या हरदा जिल्ह्यातील खिरकिया या ठिकाणी एका सभेत बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. तसंच आपल्या सासूबाईंचा आपल्याला फोन आला होता. दिवाळी येते आहे घर स्वच्छ कोण करणार असं विचारत होत्या असंही त्या म्हणाल्या. ज्यामुळे एकच हशा पिकला.

काय म्हणाल्या स्मृती इराणी?

सध्या वेळ कमी उरलाय. मी पण माझ्या घरात एकटीच सून आहे. माझ्या सासूबाईंनी मला फोन केला होता. मला म्हणाल्या मामांसाठी मतं मागते आहेस, मोदींसाठी मतं मागते आहेस पण दिवाळी तोंडावर आली आहे घराची साफसफाई कोण करणार? मी काय गांधी कुटुंबातली नाही. घरातून बाहेर पडण्याआधी आम्ही एकमेकांना विचारतो. एखाद्या पर्वाप्रमाणे असणारा दिव्यांचा उत्सव येतो आहे. प्रत्येक घरात पणत्या लागणार आहेत. मी आज सगळ्यांना सांगू इच्छिते की एक पणती राम मंदिरासाठीही आपल्या घरात तेवत ठेवा. असं स्मृती इराणी म्हणाल्या आहेत.

हे पण वाचा- प्रचारासाठी स्मृती इराणी छत्तीसगडमध्ये, कार्यकर्त्यांसाठी बनवला चहा

कांँग्रेसवर टीका

राम मंदिरावरुन त्यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसचे नेते कायम विचारायचे ‘मंदिर कब बनाएंगे.. तारीख नहीं बताएंगे’ तसं असेल तर तुम्ही आता त्यांना तारीख सांगा. ज्यानंतर सभेतले लोक २२ जानेवारी असं म्हणू लागले, त्यावर स्मृती इराणी म्हणाल्या आपण तर रामभक्त आहोत आपल्याला तारीख माहीत आहे. तुम्ही ही तारीख आता जरा काँग्रेसच्या नेत्यांना सांगा. स्मृती इराणी हे म्हणाल्या तेव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोर्टाचा निकाल काय लागतो त्याची वाट पाहिली. अत्यंत कठीण प्रसंगांतून आपण गेलो आहोत. ५०० वर्षांची प्रतीक्षा संपली आहे कारण राम मंदिर उभं राहतं आहे. आज तकने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता होणारी निवडणूक ही एखाद्या युद्धाप्रमाणेच आहे. कारण काँग्रेसने त्यांना कौरव आणि आपल्याला पांडव असं म्हटलं आहे. पण जरा आठवून पाहा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा कौरवांचं काय झालं होतं? कलयुग असो की सत्ययुग धर्माचाच विजय झाला आहे आणि होईल. आपल्या ३० मिनिटांच्या भाषणात स्मृती इराणी यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. तसंच मध्यप्रदेशात भाजपाच्या योजना काँग्रेसने कशा बंद केल्या हे देखील सांगितलं होतं.