काही व्यक्ती आमचं नाव खराब करण्यासाठी, आमची प्रतिमा मलीन करण्यासाठी आणि शेअर बाजारातलं आमचं स्थान खाली कसं घसरेल हे पाहण्यासाठी वेळेपेक्षा जास्त काम अर्थात ओव्हरटाइम करत आहेत. असं म्हणत अदाणी समूहाने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या कॅश फॉर क्वेश्चन वादावर पत्र लिहून उत्तर दिलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा आणि हिरानंदानी समूहाचे CEO दर्शन हिरानंदानी यांनी गौतम अदाणी आणि त्यांच्या कंपन्यांना बदनाम करण्यासाठी कट रचला. महुआ मोईत्रांनी विचारलेले प्रश्न हेदेखील त्या कटाचाच एक भाग आहेत असं आता अदाणी समूहाने म्हटलंय.

महुआ मित्रांवर यांचं कॅश फॉर क्वेश्चनचं प्रकरण काय?

भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी यांनी महुआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. निशिकांत दुबे म्हणाले, “संसदेत प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा लाच घेतात. मोईत्रा यांनी अदाणी समूहावरून संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते”. झारखंडचे भाजपा नेते निशिकांत दुबे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना याबाबत निवेदन दिलं आहे. दुबे यांनी निवेदनात म्हटलं आहे की महुआ मोईत्रा यांनी व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेऊन संसदेत अदाणी समूहावरून प्रश्न उपस्थित केले होते. संसदेत अदाणींवरून प्रश्न विचारून मोईत्रा यांनी हिरानंदांनी यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.

अदाणी समूहाने पत्रात काय म्हटलं आहे?

या प्रकरणात आता अदाणी समूहाने एक पत्र देऊन आपल्या समूहाची भूमिका मांडली आहे. काही व्यक्ती आणि समूह हे आमच्या ग्रुपचं नाव खराब करण्यासाठी आणि आमचं गुडविल खराब करुन शेअर बाजारातील आमची आमची स्थिती खालावली जावी यासाटी ओव्हरटाइम करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे वकील जय अनंत देहाद्री यांनी एक प्रतिज्ञापत्र सादर करत सीबीआयकडे तक्रार केली आहे. त्यानंतर अदाणी समूहाचं हे पत्र समोर आलं आहे. जय अनंत देहाद्री यांनी हा आरोप केला आहे की आहे महुआ मोईत्रा यांनी अदाणी ग्रुपबाबत प्रश्न विचारण्यासाठी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिरानंदानी यांच्या वतीने अदाणी समूहावर प्रश्न उपस्थित करण्यासाठी त्यांनी हे केलं होतं. गौतम अदाणी आणि त्यांच्या समूहाच्या कंपन्यांना टार्गेट करण्यासाठी हे केलं गेलं असंही म्हटलं आहे. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी आणि शेअर होल्डर्ससाठी हे पत्र जारी करतो आहोत. आमच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप हे बिनबुडाचे आहेत. अदाणी ग्रुप संदर्भात एका प्रकरणाची सुनावणी होणार होती. त्याच्या बरोबर एक दिवस आधी हे प्रश्न विचारले गेले आहेत. या प्रश्नांना कुठलाही ठोस आधार नाही असंही अदाणी ग्रुपने स्पष्ट केलं आहे.