एखाद्या व्यक्तीला आठ-दहा मुलं आहेत, असं ऐकलं तरी आपण थक्क होतो. पण जर तुम्हाला कोणी म्हटलं, की एखाद्या व्यक्तीला ५०० पेक्षा मुलं आहेत, तर नक्कीच तुम्हाला आर्श्चयाचा धक्का बसेल. असाच काहीसा प्रकार नेदरलॅंडमध्ये घडला आहे. येथील एक ४१ वर्षीय व्यक्ती चक्क ५५० मुलांच्या बाप असल्याचं पुढं आहे. विशेष म्हणजे त्याची मुलं संपूर्ण जगात आहेत. दरम्यान, आता ५०० पेक्षा जास्त मुलांचा बाप बनणं त्याच्यासाठी अडचणीचं ठरलं असून महिलांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – भाजपा भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ; विरोधकांवर हल्लाबोल करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले ‘२०४७’ मधील भारताचे स्वप्न

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, जोनाथन जेकब मेजर असे या व्यक्तीचे नाव असून तो नेदरलँडचा रहिवासी आहे. तो पेशाने संगीतकार असून सध्या केनियामध्ये वास्तव्यास आहे. स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून तो ५०० पेक्षा जास्त मुलांचा बाप बनला, असा दावा त्याने केला आहे. तसेच नेदरलँड्समधील १३ वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये त्याने स्पर्म डोनेट केले, असंही त्याने म्हटलं आहे.

हेही वाचा – ऑफिसच्या कामाचे तब्बल ३५५ तास त्याने सिगारेट पिण्यात घालवले; बॉसला कळताच अशी घडवली अद्दल

डचमधील कायद्यानुसार, एक व्यक्ती केवळ १२ महिलांसाठी स्पर्म डोनेट करू शकतो. तसेच त्याला २५ पेक्षा जास्त मुलांचा बाप होता येत नाही. मात्र, जोनाथनं काद्याचं उल्लंघन करत शेकडो महिलांसाठी स्पर्म डोनेट केलं असल्याचं पुढं आहे.

हेही वाचा – दारात आला महाकाय अजगर अन् तितक्यात…थरारक Video पाहून येईल अंगावर काटा

दरम्यान, ५०० पेक्षा जास्त मुलांचा बाप बनणं हे त्याच्यासाठी अडचणीचं ठरलं असून ज्या महिलांसाठी त्याने स्पर्म दिले, त्यांनी डोनरकाईंड फाऊंडेशनच्या माध्यमातून जोनाथन विरोधात तक्रार दाखल केली आहे. जोनाथनने या महिलांना न सांगता जगभरात स्पर्म डोनेट केले, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. तसेच त्याला यापुढे स्पर्म डोनेट करण्याची परवानगी देऊ नये आणि त्याने आतापर्यंत कोणत्या दवाखान्यात स्पर्म डोनेट याची माहिती संकलीत करावी, अशी मागणीही डोनरकाईंड फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sperm donor who fathered more than 500 children sued by donarkind foundation in netherlands spb
First published on: 29-03-2023 at 17:17 IST