श्रीलंकेने आपला पहिला उपग्रह ‘रावण-1’  यशस्वीरित्या अवकाशात सोडला. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. श्रीलंका आणि आसपासच्या प्रदेशाची छायाचित्रे काढणे हे या उपग्रहाचे प्रमुख काम असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंकेच्या ‘रावण-१’ या उपग्रहासोबतच जपान आणि नेपाळचे ‘बर्ड थ्री’ श्रेणीतील प्रत्येकी एक असे दोन उपग्रहही अवकाशात सोडण्यात आले.
श्रीलंकेच्याच थरिंदू दयारत्ने आणि दुलानी चमिका या अवकाश वैज्ञानिकांनी जपानच्या मदतीने हा उपग्रह विकसित केला आहे. दोघेही सध्या जपानमधील क्युशू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अवकाश अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. सिग्नस अवकाशयानाच्या माध्यमातून सर्व उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.  श्रीलंकेच्या प्रमाणवेळेनुसार सोमवारी दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला

‘द कोलंबो पेज’च्या एका वृत्तानुसार, ‘रावण-1’ हा 11.3 x 10 x 10 सेंटीमीटरचा आणि अवघ्या 1.05 किलोग्राम वजनाचा लघू उपग्रह आहे. श्रीलंका आणि आसपासच्या प्रदेशाची छायाचित्रे काढणे हे या उपग्रहाचे प्रमुख काम असेल. या उपग्रहाचं निर्धारित कालमान वर्षभराचे आहे, मात्र तो पाच वर्षांपर्यंत कार्यरत राहील अशी अपेक्षा आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lanka launches first satellite ravana 1 sas
First published on: 20-06-2019 at 11:05 IST