पीटीआय, नवी दिल्ली

श्रीलंकेचा भूभाग भारताच्या हिताविरोधात वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे आश्वासन श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले. भारताने श्रीलंकेतील चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर चिंता व्यक्त केल्यानंतर दिसनायके यांनी हे विधान केले आहे. दिसनायके तीन दिवस भारताच्या दौऱ्यावर आहेत.

दरम्यान, भारत आणि श्रीलंकेने त्यांच्या भागीदारीचा विस्तार करण्यासाठी एक दूरदर्शी दृष्टीकोन स्वीकारत सोमवारी संरक्षण सहकार्य कराराला अंतिम रूप देण्याचा निर्णय घेतला. तसेच ‘पॉवर ग्रिड कनेक्टिव्हिटी’ आणि बहु-उत्पादन पेट्रोलियम पाइपलाइन निर्माण करून ऊर्जा संबंध मजबूत करण्याचा संकल्पही केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष दिसानायके यांच्यात झालेल्या विस्तृत चर्चेदरम्यान हे निर्णय घेण्यात आले.

हेही वाचा >>>Indore Beggars : भीक देताय सावधान! ‘या’ शहरात भिकाऱ्यांना पैसे दिल्यास दाखल होणार गुन्हे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन्ही बाजूंनी आर्थिक भागीदारीसाठी गुंतवणूक आधारित विकास आणि जोडणीवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही ठरवले आहे की भौतिक, डिजिटल आणि ऊर्जा जोडणी हे आमच्या सहकार्याचे मुख्य स्तंभ असतील. श्रीलंकेच्या वीज प्रकल्पांना द्रवरूप नैसर्गिक वायूचा (एलएनजी) पुरवठा करण्यासाठी काम केले जाईल, असेही मोदी यांनी या वेळी सांगितले.