सहारा समूहाचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना सोमवारी दणका बसला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पुण्याजवळील अॅम्बी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला सोमवारी सुरुवात झाली. अॅम्बी व्हॅलीच्या लिलावासाठी ३७,३९२ कोटी रुपये राखीव किंमत निश्चित करण्यात आली आहे.

अॅम्बी व्हॅली या विकसित गिरीशहर मालमत्तेच्या लिलावाला स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी सहारा समूहाची याचिका सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळून लावली होती. लिलाव प्रक्रिया स्थगित केली तर १,५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन कसे पूर्ण कराल, असा सवालही सुप्रीम कोर्टाने सहाराला विचारला होता. ७ सप्टेंबरपर्यंत १, ५०० कोटी रुपये सेबी-सहाराच्या बँक खात्यात जमा केल्यास याचिकेवर योग्य तो निर्णय नंतर दिला जाईल, असे न्या. दीपक शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिले होते. न्या. मिश्रा यांच्या खंडपीठानं याआधीच अॅम्बी व्हॅलीच्या विक्रीसाठी असलेल्या नियम आणि अटींना मंजुरी दिली होती.

Horizon investment of thousand crores in Chakan
होरायझनची चाकणमध्ये हजार कोटींची गुंतवणूक
IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
Rizta e scooter for the family from Aether Energy
एथर एनर्जीकडून कुटुंबासाठी रिझ्टा ई-स्कूटर
Dolly Chaiwala and Bill Gates
Dolly Chaiwala मायक्रोसॉफ्ट विंडोज १२चा ब्रँड अँबॅसेडर? जाणून घ्या सत्य

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सोमवारी अॅम्बी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली. मुंबई हायकोर्टाने सोमवारी अॅम्बी व्हॅलीसाठी लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली. लोणावळा येथील ६७ हजार ६२१ एकरच्या जागेवर वसलेल्या अॅम्बी व्हॅलीच्या लिलावासाठी राखीव किंमत ३७ हजार कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात मॉरिशसमधील रॉयल पार्टनर्स इन्वेस्टमेंट फंड या कंपनीने अॅम्बी व्हॅलीमध्ये १० हजार ७०० कोटी रुपये गुंतवण्याची तयारी दर्शवली होती. तर सहारा समुहाच्या मते अॅम्बी व्हॅलीचे बाजारमूल्य १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत सहाराच्या वतीने कपिल सिब्बल यांनी कोर्टात बाजू मांडली होती. अॅम्बी व्हॅलीच्या लिलावाला १६ सप्टेंबरपर्यंत स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. सहाराच्या न्यूयॉर्कमधील मालमत्तेची विक्री लवकरच होणार असून, ७ सप्टेंबरपर्यंत समूहाला १,५०० कोटी रुपये सेबीकडे जमा करता येतील, असा दावा सिब्बल यांनी कोर्टात केला होता. त्यामुळे पैसे भरले नाही तर लिलाव अटळ असेल असे दिसते.