हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशातून दक्षिण-पश्चिम मान्सून परत जाणार आहे. ज्यामुळे पूर्वोत्तर मान्सून सुरू होण्याचा मार्ग सुरू होईल. उत्तर-पश्चिम भारतामधून उशीराने परतल्यानंतर, दक्षिण-पश्चिम मान्सून देशाच्या काही भागात सक्रीय राहतो. दक्षिण-पश्चिम मान्सून कोहीमा, सिलचर, कृष्णानगर, बारीपदा, मलकानगिरी, नलगोंडा, बगलकोट आणि वेंगुर्ल्यावरून होऊन जातो.

आयएडीने म्हटले आहे की, पूर्वोत्तर भारताचे उर्वरीत हिस्से, बंगालची संपूर्ण उत्तर खाडी, पश्चिम बंगाल आणि ओदिशाचा काही भाग, मध्य बंगालच्या खाडीचा काही भाग, आंध्र प्रदेश आणि तेलंगणच्या काही भागातून दक्षिण-पश्चिम मान्सूनल अजून मागे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या राज्यांमध्ये पाऊस पाडतो पूर्वोत्तर मान्सून –

पूर्वोत्तर मान्सून तामिळनाडू, केरळच्या काही भागांसह आंध्र प्रदेश, कर्नाटक, पुद्दुचेरीमध्ये पाऊस पाडतो. उत्तर-पश्चिम भारतातून दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या परतीचा प्रवास ६ ऑक्टोबरपासून सुरू झाला होता. १९७५ नंतर दक्षिण-पश्चिम मान्सूनची परती दुसरी सर्वाधिक उशीराने होती.२०१९ मध्ये उत्तर-पश्चिम भारतातून दक्षिण-पश्चिम मान्सूनची परती ९ ऑक्टोबरपासून सुरू झाली होती.