मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकाला काही लोकांनी विवस्त्र करत बेदम मारहाण केली आहे. संबंधित शिक्षकाने एका १७ वर्षीय विद्यार्थिबरोबर अश्लील कृत्य केलं होतं. यामुळे संतप्त जमावाने शिक्षकाला बेदम मारहाण केली आणि पोलीस ठाण्यात नेलं. शिक्षकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, पीडित विद्यार्थिनी इंदूर येथील एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये नीट (NEET) परीक्षेची तयारी करत होती. येथील एका शिक्षकाने नीट परीक्षेची तयारी करण्याच्या बहाण्याने पीडितेला एका कॅफेमध्ये बोलावलं. याठिकाणी आरोपीनं पीडित मुलीबरोबर अश्लील कृत्य केलं. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आरोपी शिक्षकाला तुकोगंज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा- मुंबई: बेशुद्ध झालेल्या पत्नीने डोळे उघडले अन् पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला, नेमकं काय घडलं?

तुकोगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र यादव यांनी सांगितलं की, कॅफेमध्ये घडलेल्या प्रकारानंतर आरोपीच्या एका सहकारी शिक्षकाने पीडितेला फोनवरून धमकी दिली. संबंधित घटनेबद्दल कुणाला काही सांगितलं तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली. यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपी शिक्षकाला विवस्त्र करत मारहाण केली.

हेही वाचा- धक्कादायक: १६ वर्षीय विद्यार्थिनीवर पाच जणांकडून गँगरेप, सर्व आरोपी जेरबंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी दोन्ही शिक्षकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिक्षकाला विवस्त्र करून मारहाण केल्याचा व्हिडीओ आमच्या निदर्शनास आला आहे. आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत, अशी माहिती तुकोगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी जितेंद्र यादव यांनी दिली.