Ola Krutrim Employee Death Case : ओलाच्या आर्टिफिशिअल इंटिलिजन्स विभागात काम करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. “माझा मृत्यू अपघातात झाला असं सांग”, असा मेसेज त्याने आत्महत्येपूर्वी त्याच्या मित्राला केला होता. निखिल सोमवंशी असं या तरुणाचं नाव असून कर्नाटकातील आग्रा लेक येथे ही घटना घडली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

निखिल सोमवंशी हा पेशाने मशिन इंजिनिअर होता. त्याचा मृतदेह आग्रा लेक येथे ८ मे रोजी सकाळी सापडला. इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्समध्ये त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. पदव्युत्तर शिक्षण घेत असताना तो चॅटबोट प्रकल्पावर काम करत होता. त्यासाठी मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून त्याला निधीही मिळाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील जळगाव येथील तो स्थानिक असून ७ मे रोजी तो घरातून निघाला आणि त्याने त्याच्या मित्राला मेसेज केला की माझा गाडीच्या अपघातात मृत्यू झाला असं घरी सांग. त्याचा मेसेज येताच त्याच्या मित्राने त्याच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. पण निखिलचा पत्ता लागू शकला नाही. त्यामुळे त्याचं शेवटचं लोकशन शोधून त्याचा मित्र तत्काळ तिथे पोहचला. तिथे त्याला तलावाशेजारी त्याच्या स्लिपर्स दिसल्या. त्यामुळे त्याने लगेच ११२ क्रमांकवर पोलिसांना फोन केला.

अंधार पडल्यामुळे रात्रीच्या वेळी तलावात त्याचा मृतदेह शोधण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मृतदेह शोधण्यात आला. बंगळुरू दक्षिण पूर्वचे पोलीस उपायुक्त सहार फातिमा यांनी या घटनेची माहिती दिली. त्या म्हणाल्या, ७ मे रोजी ही घटना घडली असून अनैसिर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

ओलातील कामाचा दबाव?

सोमवंशीचं निधन दोन आठवड्यांपूर्वी झालं असलं तरी, रेडिटवरील एका वापरकर्त्याने सोमवंशीच्या मृत्यूचा संबंध त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी असलेल्या वाईट वातावरणाशी जोडला आहे. त्यामुळे हा विषय चर्चेचा ठरलाय. व्हायरल झालेल्या रेडिट पोस्टमध्ये कामाचा दबाव आणि शाब्दिक गैरवर्तनाचा आरोप करण्यात आला होता. पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की सोमवंशी हा नवीन असूनही त्याला नेतृत्वाच्या भूमिकेत ठेवण्यात आले होते आणि दोन सहकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्याच्यावर अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा भार पडला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
25 years old Suicide at Ola krutrim banglore
byu/maheshpatil17 inIndianWorkplace

या पोस्टमध्ये सोमवंशीच्या अमेरिकेतील व्यवस्थापकाचे नावही घेतले आहे, ज्यात असा आरोप करण्यात आला आहे की तो कर्मचाऱ्यांना, विशेषतः कनिष्ठ कर्मचाऱ्यांना वारंवार शिवीगाळ करत असे. “राजकिरणला लोकांना कसे व्यवस्थापित करायचे हे माहित नव्हते. तो लोकांना मारहाण करायचा आणि नंतर गायब व्हायचा”, असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच अभियंत्याच्या मृत्यूनंतर वर्तनात कोणताही बदल झाला नाही आणि कर्मचाऱ्यांना त्याबद्दल बोलू नये असा इशारा देण्यात आला आहे. वापरकर्त्याने कंपनीच्या अंतर्गत परिस्थितीचे वर्णन “दयनीय” असे केले आहे.