प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाला लुटणाऱ्यांनी नोटाबंदी, जीएसटी आणून नोकरी असणाऱ्या दोन कोटी तरुणांच्या नोकऱ्या घालवल्या. अशा सत्ताधाऱ्यांना पुन्हा जनतेने थारा देऊ नये. विदेशवारी करणाऱ्या नरेंद्र मोदींना जर चौकीदार व्हायचे असेल तर त्यांनी चौकीदारीच करावी, पंतप्रधान होण्यासाठी खटाटोप करून निवडणूक लढविण्याची काय गरज, असा खोचक सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांच्या प्रचारार्थ बुधवारी दर्गाह मदानावर प्रचारसभा झाली. या सभेस उमेदवार अर्जुन सलगर, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील, िलगायत समाजाचे नेते शिवानंद ऐबतपुरे, मिलिंद रोकडे, धनंजय शिंगाडे, अण्णासाहेब पाटील आदींची उपस्थिती होती.

जनेतेने मोठय़ा कष्टाने जमवलेला पसा नोटाबंदी करून मोदींनी लुटला.  महाराष्ट्रात सुरू असलेले परिवर्तन मोदींसह अन्य राजकारण्यांच्या पचनी पडत नाही. अशा लुटारूंना सत्तेवरून खाली खेचले पाहिजे. उस्मानाबाद जिल्ह्यतील राजकारण दोन भावांच्या भोवतीच फिरताना दिसत आहे. हे बहुजन समाजाने ओळखले आहे. परंतु आता राजकीय परिस्थिती वेगळी आहे. यामुळे घरातील ही सत्ता उलथवून टाका. तसेच सध्या देशातील राजकीय वातावरणही बदलल्याने पंतप्रधान मोदी वेडय़ासारखे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार इम्तियाज जलील म्हणाले की, ज्या मुद्यावर मोदी देशाचे पंतप्रधान झाले. ते मुद्दे बाजूला ठेवून वेगळेच राजकारण सुरू आहे. काही पुढारी मुस्लीम मते ही आमची जहांगीर असल्याचे सांगत होते. मात्र, आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्वाना समान न्याय मिळत आहे.  भाजपातील काही पुढारी हे सुशिक्षित बेरोजगारांनी पकोडे विकण्याची भाषा करतात. परंतु वंचित आता मोदींना चाय-चाय करत तर अमित शहांना पकोडे विकत बसविणार असल्याचे नमूद केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There were 2 crore vacancies due to the demonetization
First published on: 11-04-2019 at 02:30 IST