पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ( सोमवार ११ जुलै) संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाचे अनावरण केले. मात्र, या अशोक स्तंभावरून आता वाद सुरू झाला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार आणि महुआ मोईत्रा यांनी दिल्लीतील संसदेच्या नवीन इमारतीवरील अशोक स्तंभाची “आक्रमक” आणि “विसंगत” प्रतिमा बसवून राष्ट्रीय चिन्हाचा अपमान केल्याचा आरोप मोदी सरकारवर केला आहे.

जवाहर सरकार यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर टीकास्र सोडले. “मोदी सरकारने आपल्या राष्ट्रीय चिन्हाचा, भव्य अशोक स्तंभाचा अपमान केला आहे. मूळ अशोक स्तंभ शांत, संयमी, सुंदर आणि डौलदार आहेत. तर मोदींनी अनावरण केलेला अशोक स्तंभ रागीट, असुरक्षित हिंसेचे प्रतीक वाटत आहे.” असे ते म्हणाले. तसेच नवीन इमारतीवरील अशोक स्तंभ ताबडतोब बदलावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

तसेच लोकसभा खासदार महुआ मोइत्रा यांनी अशोक स्तंभाचे दोन फोटो ट्वीट करत मोदी सरकार निशाणा साधला आहे. महुआ मोइत्रा जुने अशोक स्तंभ आणि काल पंतप्रधान मोदींनी अनावरण केलेल्या अशोक स्तंभाचे दोन फोटो ट्वीट केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी (११ जुलै) संसदेच्या नवीन इमारतीवर बांधण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे अनावरण केले होते. या अशोक स्तंभाची उंची ६.५ मीटर असून हे कांस्यपासून बनवलेले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच या स्तंभाचे वजन ९ हजार ५०० किलो आहे. नवीन संसदेच्या छतावर हे अशोक स्तंभ बांधण्यात आले आहे. नवीन संसदेच्या इमारतीचे बांधकाम हिवाळी अधिवेशनापर्यंत पूर्ण होणार आहे.

हेही वाचा – कोकणासह राज्यात अतिमुसळधार पाऊस, पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा