पीटीआय, कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने वर्चस्व कायम राखले. ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांमध्येही सर्वाधिक जागा जिंकून तृणमूलने भाजपसह अन्य विरोधकांना पराभूत केले.राज्यातील ६३,२२९ ग्रामपंचायत जागांसाठीची मतमोजणी मंगळवारी करण्यात आली. मंगळवारी रात्रीपर्यंत जाहीर झालेल्या निवडणूक निकालानुसार तृणमूल काँग्रेसने २७,९८५ पैकी १८,६०६ जागांवर विजय मिळवला. भाजपने ४,४८२ जागांवर विजय मिळवला असून, २,४१९ जागांवर आघाडी घेतली होती. डाव्या पक्षांनी १,५०२ जागांवर विजय मिळवला, तर ९६९ जागांवर आघाडी घेतली. काँग्रेसने १,०६० जागा जिंकत ६९३ जागांवर आघाडी घेतली होती.

पंचायत समित्यांमध्येही तृणमूल काँग्रसने वर्चस्व राखले. तृणमूलने पंचायत समित्यांच्या ११८ जागा जिंकल्या, तर ७८२ जागांवर आघाडी घेतली. जिल्हा परिषदेतही तृणमूलने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तृणमूलने १८ जागा जिंकल्या असून, माकपने दोन जागांवर विजय मिळवला आहे.
हिंसाचाराचे गालबोट लागलेल्या या निवडणुकीसाठीची मतमोजणी बुधवारीही सुरूच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारीच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.