मणिपूरमध्ये शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या नऊवर पोहचली असून दहाजण जखमी झाले आहेत. खोयाथोंगमध्ये आणि खुरई भागात प्रत्येकी एका बॉम्बचा स्फोट झाला. दोन्ही ठिकाणी आयईडीचा वापर करण्यात आला होता. या स्फोटात ठार झालेले नऊजण कामगार आहेत. एका दुकानात हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. बॉंम्ब एवढा शक्तीशाली होता, की स्फोटाचा आवाज घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर परिसरात ऐकू गेला. सर्व मृत व्यक्ती परराज्यातील असून मणिपूरमध्ये नोकरीच्या निमित्ताने आल्या होत्या. तरी, पिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.
याआधी २७ जून रोजी मणिपूरमध्ये युरिपोक भागात झालेल्या एका बॉम्बस्फोटात दोन ठार आणि चारजण जखमी झाले होते. युरिपोकमधील स्फोटात ठार झालेले दोघेजण देखिल परराज्यातून मणिपूरमध्ये नोकरीच्या निमित्ताने आले होते.
संग्रहित लेख, दिनांक 14th Sep 2013 रोजी प्रकाशित
मणिपूरमधील बॉम्बस्फोटात नऊ ठार
मणिपूरमध्ये शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या नऊवर पोहचली असून दहाजण जखमी झाले आहेत.

First published on: 14-09-2013 at 02:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Twin blasts in manipur claim 9 lives 10 others injured