Two Israeli Embassy staffers killed in Washington shooting : वॉशिंग्टन डीसी येथील ज्यू संग्रहालयाजवळ बुधवारी संध्याकाळी झालेल्या गोळीबारात इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, अशी माहिती होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांनी दिली आहे. मेट्रोपोलिटन पोलीस विभागाने सांगितले की या प्रकरणी एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेत एक पुरूष आणि एक महिला ठार झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल वर पोस्ट केली आहे. “डीसी येथील हे भयानक हत्याकांड निश्चितपणे याहूदी-विरोधी भावनांवर आधारित आहे, या आत्ताच थांबल्या पाहिजेत! अमेरिकेत द्वेष आणि कट्टरतावादाला स्थान नाही. पीडितांच्या कुटुंबियांबद्दल सद्भावना,” असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देखील वॉशिंग्टन येथे झालेल्या दोन इस्त्रायली कर्मचाऱ्यांच्या हत्येवर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा गोळीबार धक्कादायक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच जगभरातील सर्व इस्रायली दूतावासांमध्ये सुरक्षा वाढवली जाईल, असेही म्हटले आहे. याहूदी विरोधी भावनेची आणि इस्त्रायलविरोधातील टोकाची चिथावणी याची भयानक किंमत आपण मोजत आहोत. इस्त्रायलविरोधातील ब्लड लिबेल्सची (Blood Libels) किंमत रक्ताने मोजावी लागत आहे आणि याचा शेवटपर्यंत सामना केला पाहिजे, असे नेतान्याहू म्हणाले आहेत.

सेक्रटरी नोएम यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.

त्यांनी सांगितले की, वॉशिंग्टन डीसी येथील ज्यू संग्रहालयाजवळ आज रात्री दोन इस्त्रायली दूतावासातील कर्मचाऱ्यांची निर्घृणपणे हत्या करण्या आली आहे. आम्ही याची कसून चौकशी कत आहोत आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी काम करत आहोतय. कृपया पीडितांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करा. आम्ही या प्रकरमातील गुनेहगारांना न्यायापर्यंत घेऊन जाऊ.