नवी दिल्ली : दिल्लीच्या सत्य निकेतन भागात सोमवारी एका इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू असताना ही इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या चार मजुरांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिल्ली अग्निशमन दलाचे प्रमुख अतुल गर्ग यांनी दिली. तीन मजली घराचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली. ढिगाऱ्याखाली एकूण सात मजूर गाडले गेले होते. त्यापैकी दोघांचा मृ्त्यू ओढवला. महिन्याभरापासून हे काम सुरू होते. सोमवारी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी इमारतीच्या छताचा निम्मा भाग कोसळला. काही वेळातच तेथे एनडीआरएफच्या पथकाने मदतकार्य सुरू केले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Apr 2022 रोजी प्रकाशित
दिल्लीत इमारत कोसळून दोन ठार
तीन मजली घराचे काम सुरू असताना ही दुर्घटना झाली. ढिगाऱ्याखाली एकूण सात मजूर गाडले गेले होते.
Written by एक्स्प्रेस वृत्तसेवा

First published on: 26-04-2022 at 02:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two killed in delhi building collapse zws