इराणच्या मध्य भागातील सुन्नी पंथीयांच्या दोन मशिदी सोमवारी स्फोटकांनी उद्ध्वस्त करण्यात आल्या, तसेच एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. सौदी अरेबियाने एका प्रमुख शिया धर्मगुरूचा शिरच्छेद केल्यानंतर वांशिक संघर्ष नव्याने सुरू झाल्याची भीती यामुळे व्यक्त करण्यात येत आहे.
लष्कराचा गणवेश घातलेल्या काही लोकांनी बगदादच्या दक्षिणेकडे असलेल्या हिला भागातील दोन सुन्नी मशिदींमध्ये स्फोट घडवून आणले, तसेच मशिदीतून अजान देणाऱ्या ‘मुएझ्झिन’ला इस्कंदारिया येथे त्याच्या घराजवळ गोळ्या घालून ठार मारले, असे सूत्रांनी सांगितले. राजधानी बगदादपासून ८० किलोमीटरवर असलेल्या हिला भागातील बकेर्लीनजिकच्या अम्मार बिन यासेर मशिदीवर मध्यरात्रीनंतर बाँब फेकण्यात आल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. स्फोटांचे आवाज ऐकल्यानंतर आम्ही तेथे पोहचलो, तेव्हा तेथे स्फोटके (आयईडी) पेरून ठेवण्यात आल्याचे आम्हाला दिसले. लष्करी गणवेश घातलेल्या लोकांनी हे कृत्य केल्याचे रहिवाशांनी आम्हाला सांगितले.