आगामी निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष सत्तेत आल्यास अमेरिका मोदींचे स्वागतच करेल असे अमेरिकन अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात २००२ सालच्या गुजरात दंगलींमुळे अमेरिकेत येण्यापासून मोदींवर घातलेली प्रवेशबंदी अमेरिकेकडून लवकरच उठविण्यात येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र उपमंत्री निशा बिस्वाल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आगामी काळात मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यास त्यांच्याशी व्यवहार करताना अमेरिकेला कोणताही आक्षेप नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकशाही असलेल्या भारतासारख्या देशात जनतेने निवडून दिलेल्या नेत्याबरोबर व्यवहार करण्यास अमेरिका नेहमीच तत्पर असेल, असेसुद्धा त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2014 रोजी प्रकाशित
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला अमेरिकेचा हिरवा कंदील
आगामी निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष सत्तेत आल्यास अमेरिका मोदींचे स्वागतच करेल असे अमेरिकन अधिका-यांकडून सांगण्यात आले आहे.
First published on: 07-03-2014 at 04:19 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: U s says ready to do business with indian front runner modi